सुंदरा मनामध्ये भरली च्या कलाकारांशी साधता येणार संवाद | पुढारी

सुंदरा मनामध्ये भरली च्या कलाकारांशी साधता येणार संवाद

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील अभिमन्यू – लतिकाच्या नात्यात येणार कायमचा दुरावा? हे ऐकण्यासाठी थेट त्यांच्याशीच संवाद साधण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठीच्या वतीने रविवार, दि. 8 रोजी सायंकाळी पाच वाजता ‘कलरफुल संडे’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. @pudharionline/@pudharikasturi या फेसबुक पेजच्या माध्यमातून मालिका व कलाकारांशी संवाद साधता येणार आहे. त्यांची अधिक माहिती जाणून घेऊन प्रश्न विचारता येणार आहेत.

कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अभिमन्यू व लतिकाच्या नात्याचे सत्य जहागीरदार आणि धुमाळ कुटुंबासमोर आले. हे सत्य लपवल्यामुळे अभी व लतिकाचे नाते पणाला लागले. एकीकडे अभिमन्यूने आईला दिलेले वचन की, मी लतिकाला घरी परत घेऊन येणार तर दुसरीकडे लतिकाने बापूंना दिलेला शब्द. अभिमन्यू-लतिका या संकटाला कसे सामोरे जातील? कशी एकमेकांची साथ देतील, हे जाणून घेण्यासाठी बघत राहा ‘सुंदरा मनामध्ये भरली’.

विशेष कार्यक्रमासाठी @pudharionline/pudharikasturi या फेसबुक पेजला सर्च करा, लाईक करा आणि फॉलो करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘पुढारी’ कस्तुरी क्लब सभासद नोंदणी सुरू

मनोरंजन, सेलेब्रिटी, गप्पा-टप्पा, रेसिपी शो, सहल, नाटक विविध प्रशिक्षण अशा कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी आजच कस्तुरी क्लबचे सभासद व्हा..!

सभासद नोंदणी फी 600 रुपये असून हमखास गिफ्ट मॅजिक स्पिन मॉप आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : कोल्हापूर : 8483926989, सांगली : 9607957576, सातारा : 9762527109, , गडहिंग्लज : 9423539561, इस्लामपूर : 8308706122, कराड : 8796471210

Back to top button