टोकियो : प्राचीन जपानी मकबर्यांबाबत आता प्रथमच एक विश्लेषण करण्यात आले आहे. या मकबर्यांना 'कोफून' म्हणून ओळखले जाते. पोलिटेक्निको डी मिलानोच्या रिसर्च ग्रुपने त्यांच्यावर प्रथमच एक संशोधन केले आहे. त्यानुसार हे मकबर्यांचे कुलपाच्या छिद्राच्या आकाराचे स्थान पूर्वाभिमुख आहे.
याठिकाणी असलेल्या स्मारकांकडे जाण्यास लोकांना मज्जाव असल्याने तिथे अद्यापही फारसे संशोधन झालेले नाही. मात्र, आता हाय-रिझोल्यूशन सॅटेलाईट प्रतिमांच्या सहाय्याने या प्राचीन मकबर्यांबाबत नवे संशोधन करण्यात आले. पूर्वाभिमुख असलेल्या या स्थानाचा संबंध अमेतरासू नावाच्या देवीशी संबंधित असल्याचे मानले जाते.
जपानी सम—ाट आपल्या राजवंशाच्या पौराणिक उत्पत्तीशी या देवीला जोडतात. याठिकाणी अनेक प्राचीन मकबरे आहेत. तिसर्या ते सातव्या शताब्दीच्या काळात त्यांची निर्मिती झाली. यामधील सर्वात मोठे मकबरे जपानी सम—ाटांचे आहेत. छोटे मकबरे शाही परिवाराचे सदस्य आणि उच्च अधिकार्यांचे आहेत. 'डैसेन कोफून' नावाचा मकबरा पृथ्वीवरील सर्वात मोठ्या मकबर्यांपैकी एक आहे. त्याची लांबी सुमारे 486 मीटर आणि उंची 36 मीटर आहे. जपानचा सोळावा सम—ाट निंटोकू याचा हा मकबरा आहे.
हेही वाचलतं का?