Virat Kohli Viral Poster : आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई विरुद्ध गुजरातचा चर्चा मात्र विराट कोहलीची

Virat Kohli Viral Poster : आयपीएलचा अंतिम सामना चेन्नई विरुद्ध गुजरातचा चर्चा मात्र विराट कोहलीची
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सीएसके आणि गुजरात यांच्यातील अंतिम सामना २८ मे रोजी होऊ शकला नाही. मुसळधार पावसातही चाहत्यांची क्रेझ कायम होती. पावसामुळे एकीकडे नाणेफेकीची प्रतीक्षा सातत्याने वाढत असताना दुसरीकडे चेन्नईचे चाहते माहीची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते, मात्र शेवटी हवामानाने सामन्यात कहर केला आणि सामना रद्द करण्यात आला. पुढे ढकलण्यात आला आणि आता हा सामना आज राखीव दिवशी खेळवला जात असताना सोशल मीडियात चर्चा मात्र विरोट कोहलीची रंगली आहे. (Virat Kohli Viral Poster)

#ViratKohli का सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला (Virat Kohli Viral Poster)

रविवारी मुसळधार पावसामुळे सामना पुढे ढकलल्यानंतर पाऊस टाळण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी चाहत्यांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमच्या स्टँडवरून विराट कोहलीचा मोठा बॅनर काढून त्याच्या मदतीने पावसात भिजणे टाळले. पाऊस न लागावा यासाठी प्रेक्षकांनी विराट कोहलीचे डोक्यावर पोस्टर घेतलेला व्हिडिओ फॅन्स शेअर करु लागले आणि यावर युजर्ससुद्धा मोठ्या संख्येने प्रतिक्रीया देत आहेत.

चार वेळा चॅम्पियन झालेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी मागील हंगाम दुःस्वप्नापेक्षा कमी नव्हता, परंतु या मोसमात धोनीने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत पोहोचवला. आता त्याचा सामना गतवर्षीच्या विजेत्या गुजरात टायटन्ससमोर होत आहे. गुजरातच्या संघाने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जसमोर २०० हून अधिक धावांचे आव्हान उभे केले आहे. आता आतुरता कोणता संघ आयपीएल २०२३ चा मानकरी ठरतो याची लागली असली तरी. सोशल मीडियात चर्चा मात्र विराट कोहली रंगलेली दिसत आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news