Delhi Murder Crime : दिल्‍लीत अल्‍पवयीन मुलीचा निर्घृण खून; माथेफिरू आरोपी अटकेत

file photo
file photo

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शाहबाद डेअरी परिसरात एका माथेफिरुने अल्पवयीन मुलीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. या माथेफिरुने १६ वर्षीय तरुणीवर चाकूने तब्बल ४० वार केले. त्यानंतर पुन्हा दगडाने ठेचून खून केला. या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपीला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक देखील करण्यात आली आहे.

या घटनेबाबत पाेलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, साक्षी असे खून झालेल्‍या मुलीचे नाव आहे. ती १६ वर्षांची हाेती. खूनाची संपूर्ण घटना घटनास्थळावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. साहिल असे माथेफिरु आरोपीचे  नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि साक्षी मित्र होते. रविवारी (दि. २८ मे) दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले, त्यानंतर साहिलने साक्षीवर ४० वेळा वार केले. चाकुने वार करुनही माथेफिरु साहिलचे समाधान झाले नाही. चाकूने वार करुनही त्‍याने दगडाने ठेचून साक्षीचा निर्घृण खून केला. दिल्ली पोलिसांनी आरोपी साहील याला उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली.

सीसीटीव्‍ही फूटेजमध्‍ये स्‍पष्‍ट दिसत आहे की, या घटनेत मारेकरी साहिल ही घटना घडवत असताना रस्त्यावर बरेच लोक उपस्थित होते. बरेच लोक इकडे तिकडे जात होते. साक्षीला वाचवण्याचा किंवा साहिलला थांबवण्याचा प्रयत्न देखील कोणी केला नाही. सीसीटीव्हीमध्ये अनेकजण इकडून तिकडे फिरताना दिसले; पण साहिलला थांबवण्याची हिंमत कोणाचीच झाली नसल्‍याचे स्‍पष्‍ट हाेत आहे. साक्षीचा खून करुन साहिल घटनास्‍थळावरुन पसार झाल्‍याचेही सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये दिसत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news