Latest
Viral Video UP : काळ आला होता; पण ‘त्याने’ देवदूत होवून मृत्यूच्या दाढेतून केली महिलेची सुटका
पुढारी ऑनलाईन डेस्क : रेल्वे स्टेशनवर एका रेल्वे पोलिस दलाच्या जवानाने आपला जीव धोक्यात घालत एका महिलेचा जीव वाचवला ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील ललितपूर रेल्वे स्टेशनवर. येथे रेल्वे पोलिस दलाच्या जवानाने वृध्देचा जीव वाचवला. या घटनेचा थरारक व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ताे रेल्वे विभागाने (Viral Video UP) शेअर करत प्रवाशांना नियमांचे पालन करावे, अशी सूचना केली आहे.
Viral Video UP : काळ आला होता, पण….
काही माणसांच्या बाबतीत असं होत की, काळ आला होता; पण वेळ आली नव्हती. असच काहीसं उत्तर प्रदेशच्या एका वृध्देच्या बाबतीत घडलं. सोशल मीडियावर ललितपूर स्टेशनवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Viral Video) यामध्ये दिसत आहे की, रेल्वे पोलिस दलाचा जवान पाठीमागून येणारी रेल्वे पाहून रेल्वे ट्रॅक ओलांडून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या वृध्देला मागे जाण्यास सांगत आहे; पण रेल्वेचा भरधाव वेग पाहता त्या कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत आपला जीव धोक्यात घालून त्या महिलेला प्राण वाचवले.
कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिड[ओ रेल्वे विभागाने (Ministry of Railways) आपल्या सोशल मीडियावर शेअर करत प्रवाशांना सुचना दिल्या आहेत की, एका फलाटवरून दुसऱ्या फलाटवर जाण्यासाठी फूट ओव्हर किंवा ब्रिजचा वापर करावा. प्रसंगाचे भान राखत जीव वाचवलेल्या रेल्वे पोलिस दलाच्या जवानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वृध्देचे प्राण वाचविणार्या जवानांवर सोशल मीडीयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचलतं का?
- IAF Agnipath scheme : 'अग्निपथ'साठी हवाई दलाचा भरती प्लॅन जाहीर; अग्निवीरांना मिळणार 'या' सुविधा
- गुजराती केशरची पुण्याकडे पाठ; स्थानिक बाजारपेठांमध्येच आंब्याला चांगले दराचे परिणाम
- युरियाच्या औद्योगिक वापरात दोषींवर गुन्हे; केंद्राच्या आदेशान्वये कृषी विभागाकडून तपासणी सुरू
- सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात; ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, एक प्रवाशी ठार

