Agnipath protests Updates : जंतर-मंतरवर ‘अग्‍निपथ’विरोधात काँग्रेसचा ‘सत्‍याग्रह’ | पुढारी

Agnipath protests Updates : जंतर-मंतरवर 'अग्‍निपथ'विरोधात काँग्रेसचा 'सत्‍याग्रह'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
केंद्र सरकारच्‍या अग्‍निपथ भरती योजनेविरोधात काँग्रेस पक्षाकडून दिल्‍लीतील जंतर-मंतरवर आज सत्‍याग्रह करण्‍यात येत आहे. (Agnipath protests Updates) दरम्‍यान, विविध राज्‍यांमध्‍ये या योजनेविरोधात तरुण रस्‍त्‍यावर उतरले आहेत. यावेळी काँग्रेस नेत्‍या प्रियंका गांधी-वढेरा, सचिन पायलट यांच्‍या अन्‍य नेते उपस्‍थित होते. दरम्‍यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तिन्‍ही दलांच्‍या प्रमुखांबरोबर आज बैठक घेणार आहेत.

केंद्र सरकारला ‘अग्‍निपथ’ योजना रद्‍द करावी लागेल : सचिन पायलट

केंद्र सरकार अन्‍यायकारक कायदे करुन ते जनतेवर लादत आहेत. अग्‍निपथ योजनेलाही देशभरातील युवकांचा तीव्र विरोध होत आहे. कृषी कायद्‍याप्रमाणेच केंद्र सरकारला ही योजना रद्‍द करावी लागेल, असे यावेळी सचिन पायलट यांनी सांगितले.

Agnipath protests Updates : राहुल गांधींचा पुन्‍हा केंद्रावर हल्‍लाबोल

अग्‍निपथ योजनेविरोधात आज राहुल गांधी यांनी पुन्‍हा एकदा ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्‍लाबोल केला. त्‍यांनी म्‍हटलं आहे की, देशातील युवकांना रोजगारासंदर्भात खोटी आश्‍वासने देण्‍यात आला. आता पंतप्रधानांनी देशातील युवकांना बेरोजागरीच्‍या ‘अग्‍निपथा’वर चालण्‍यास सक्‍ती केली आहे. ८ वर्षांमध्‍ये १६ कोटी नोकर्‍या देण्‍याचे आश्‍वासन देण्‍यात आले होते. मात्र युवकांना केवळ भजी कशी तळावीत याचे ज्ञान दिले गेले. या सर्व परिस्‍थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत.

हेही वाचा :

Back to top button