

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद येथे तरुणाचा खून झाला आहे. गुन्हेगाराने तरुणाला भररस्त्यावर चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडलीय. काही दिवसांपूर्वीच छावणी, एमआयडीसी वाळूज आणि जिन्सीत सराईत गुन्हेगाराने जुन्या वादातून तरुणांना भोसकले होते.
अधिक वाचा-
आता पुन्हा एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने जुन्या वादातून तरुणाचा खून केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री संजयनगरात घडली.
मंगेश दिनकर माळोदे (वय २८, रा. संजयनगर, बायजीपुरा) असे मृताचे नाव आहे. शेख अरबाज उर्फ विशाल उर्फ भुऱ्या याला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक वाचा –
गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. जखमी मंगेश मध्यरात्रीनंतर १ वाजता घाटीत मृत झाला.
अधिक वाचा-
जुन्या वादातून भुऱ्याने मंगेशसोबत भांडण उकरून काढले होते. तेव्हा मंगेश भुऱ्याला त्याच्या आईसमोर शिवीगाळ केली होती. त्या रागातून भुऱ्याने अवघ्या दोन दिवसांत मंगेशचा काटा काढला.
अधिक वाचा-
पाहा व्हिडिओ – ३६५ पैकी ३६० दिवस सेवा देणारे 'फ्रंटलाईन योद्धे' लसीकरण | पुढारी लसीकरण अभियान