सोलापूर : सराईत चाेरटा जाळ्यात, करमाळा पाेलिसांची कारवाई

सोलापूर : सराईत चाेरटा जाळ्यात, करमाळा पाेलिसांची कारवाई

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : करमाळा, दौंड, कुर्डुवाडी, बारामती परिसरात दरोडा, चोरी यासह ११ गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपीला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खाजा राजेंद्र काळे (वय ४० रा. भगतवाडी, ता. करमाळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना रेल्वेमध्ये दरोडा व अनेक गुन्ह्यांमधील फरारी आरोपी जिंती भगतवाडी केत्तुर गाव परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक कोकणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलिस कॉन्स्टेबल तौफिक काझी यांचे पथक रवाना केले. या पथकाने पारेवाडी शिवारात सापळा रचून फरार आरोपीस अटक केली. संशयित हा सराईत चाेरटा असून त्याच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news