पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण

पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण
Published on
Updated on

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील रुनमळी गावात आपल्याविषयी काहीतरी बोलत आहेत. असा संशय आल्यावरून काही जणांनी घरात शिरून इसमास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

करणसिंग गारू पवार (वय ३६, रा.रूनमळी ता.साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर महारू पवार याच्याकडे आपल्याविषयी काहीतरी बोलत असल्याचा संशय आला. त्यावरुन दुसऱ्या दिवशी तो महारू कृष्णा पवार, आशाबाई बन्सीलाल मोरे, कविता कन्हैय्या पिंपळे (सर्व रा. रूनमळी) यांचेसह सकाळी ९ वाजता घरात शिरला. त्याने संशयाच्या विषयावरून वाद घालण्यास सुरूवात केली. या वादाचे पर्यवसाण हाणामारीत झाले. यात किशोर पवार याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केली तर इतर तिघांनी शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात महारू कृष्णा पवार, आशाबाई बन्सीलाल मोरे, कविता कन्हैय्या पिंपळे या संशयितांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news