नंदुरबार : 2014 पासूनच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार एफ.एम.रेडिओ केंद्र सुरू: खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार: आकाशवाणीच्या एफ.एम केंद्राचे उद्घाटनप्रंसगी माहिती देताना खासदार डॉक्टर हिना गावित. समवेत पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित  (छाया: योगेंद्र जोशी) 
नंदुरबार: आकाशवाणीच्या एफ.एम केंद्राचे उद्घाटनप्रंसगी माहिती देताना खासदार डॉक्टर हिना गावित. समवेत पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित  (छाया: योगेंद्र जोशी) 
Published on
Updated on

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

येथे शुक्रवार (दि.28) आज आकाशवाणीच्या एफ.एम केंद्राचे तसेच देशातील विविध ठिकाणाच्या 91 व 100 वॉट ट्रान्समीटरच्या एफ.एम. केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रीमोट पद्धतीने पार पडले. आकाशवाणीकडे असलेली माहिती आदिवासी दुर्गम जनतेपर्यंत पोहोचू शकेल आणि नव्या पिढीला त्यातून प्रेरणा मिळेल. असा विश्वास व्यक्त करून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्यांचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कार्यक्रमाला आकाशवाणी जळगावचे केंद्रप्रमुख दिलीप म्हसाणे, कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे, प्रा. डॉ. पितांबर सरोदे यांच्यासह नागरिक, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधतांना पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्याची आकांक्षित आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असून येथे आकाशवाणीचे केंद्र नसल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या योजना व धोरणांची माहिती मिळत नव्हती. परंतु शुक्रवार (दि.28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील केंद्राचे उद्घाटन झाल्याने ही माहिती आता येथील नागरिकांना मिळणार आहे.

संसदरत्न खासदार डॉ. गावित म्हणाल्या की, 2014 पासून जेव्हा खासदार झाले तेव्हापासून नंदुरबार येथे एफ.एम. केंद्र सुरु करण्याची मागणी होती. त्यावेळी पासून हे केंद्र सुरु होण्यासाठी केंद्र सरकारशी सातत्याने पाठपुरावा करत होते. नंदुरबार येथे आकाशवाणी केंद्र सुरु होण्यासाठी माहिती व प्रसारण विभागाकडे पाठपुरावा करत असतांना एक गोष्ट लक्षात आली की, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असल्याने येथे एफ.एम केंद्र सुरु करण्यासाठी खाजगी कंपनीचे इच्छुक नव्हती. त्यामुळे अखेर केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास शुक्रवार (दि.28) आज यश मिळाले असल्याने पंतप्रधान तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा युवा कार्य आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचे आभार मानण्यात आले. एफ.एम चॅनेलमुळे नंदुरबार जिल्ह्यातील युवा, महिला, शेतकरी तसेच प्रत्येक घटकाला एफ.एमच्या माध्यमातून आवडीचे कार्यक्रम आता ऐकता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर आकाशवाणीकडे अनेक जुन्या व नव्या गाण्याचा संग्रह असल्यामुळे नागरीकांना व विद्यार्थ्यांना माहिती बरोबरच सुमधूर संगीतांचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरस्थप्रणालीवरुन देशातील विविध केंद्राचे उद्घाटन करुन मनोगत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की, "आवश्यक माहिती वेळेवर पोहोचवणे, समाज बांधणीचे काम, शेतीशी संबंधित हवामानाची माहिती, शेतकऱ्यांना पिकांच्या, फळभाज्यांच्या किमतीची अद्ययावत माहिती मिळणे, रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या नुकसानावर चर्चा करणे, शेतीसाठी आधुनिक यंत्रे. मग ते पूलिंग असो, महिलांना सांगणे. नवीन बाजारपेठेबद्दल स्वयं-मदत गट किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संपूर्ण क्षेत्राला मदत करणे, हे एफएम ट्रान्समीटर खूप महत्त्वाची भूमिका बजावतील. आज ऑल इंडिया रेडिओच्या एफएम सेवेचा हा विस्तार ऑल इंडिया एफएम बनण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या 91 एफएम ट्रान्समीटरचे हे लाँच म्हणजे देशातील 85 जिल्ह्यांतील 2 कोटी लोकांसाठी भेटवस्तू आहे. गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या तंत्रज्ञान क्रांतीने रेडिओ आणि विशेषतः एफएमलाही नव्या अवतारात आकार दिला आहे. इंटरनेटमुळे रेडिओ मागे राहिलेला नाही, तर ऑनलाइन एफएम, पॉडकास्टच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण मार्गाने पुढे आला आहे. Connectivity कोणत्याही स्वरूपात देशातील 140 कोटी जनतेला जोडण्याचे मिशन बनावे ही अपेक्षा आहे."

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news