नागपूर: आशा व गटप्रर्वतक कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर हल्लाबोल आंदोलन

नागपूर: आशा व गटप्रर्वतक कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर हल्लाबोल आंदोलन
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या आशा व गटप्रर्वतक कर्मचाऱ्यांचे नागपूर जिल्हा परिषदे समोर आंदोलन सुरू आहे. यावेळी राज्य व केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत रास्ता रोको आंदोलन केले.

आज सिव्हिल लाईन्स, विभागीय आयुक्तालय परिसरात नागपूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील आशा व गटप्रर्वतक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी केली आहे. वेतनवाढ देण्यात यावी, ग्रॅच्युअटी द्यावी, ऑनलाईन कामे करण्यासाठी मोबाईल उपलब्ध व्हावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news