Uncategorized
औरंगाबाद: ‘कन्नड साखर’चे माजी संचालक शामसिंग राजपूत यांचे निधन
नाचनवेल; पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील कन्नड सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शामसिंग सांडूसिंग राजपूत (८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज (दि.२६) दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भरतसिंह राजपूत यांचे ते चुलते होत. तर नाचनवेल ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राजेंद्र राजपूत यांचे ते वडील होत.
हेही वाचा