औरंगाबाद : पैठण येथील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट | पुढारी

औरंगाबाद : पैठण येथील गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यापासूनजवळ असलेल्या बाभूळगाव (ता. शेवगाव) येथील गंगामाई साखर कारखान्याच्या डीसलरी विभागात मोठा स्फोट झाल्याची घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी घडली आहे. या ठिकाणी दर पाच मिनिटाला स्फोट होत असल्यामुळे घटनास्थळी बचाव कार्य करण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना शर्यतीचा प्रयत्न करावे लागत आहेत.

अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्याजवळ असलेल्या बाभूळगाव (ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर) येथील गंगामाई साखर कारखान्यात नेहमीप्रमाणे डीसलरी विभागात काम सुरू होते. दरम्यान, स्फोटाचा मोठा आवाज झाला. स्फोटामुळे कारखान्याला लागलेल्या भीषण आगमुळे कामगारांनी आपला जीव मुठीत धरून पळापळ सुरू केली.

घटनेची माहिती मिळताच शेवगाव तहसीलदार छगनराव वाघ, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. पैठण, शेवगाव आणि अहमदनगर या परिसरातून जवळपास १० अग्निशमनदल पथक व रुग्णवाहिका पाचारण करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी नागरिकांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आग आटोक्यात आल्यानंतरच कारखान्यात झालेल्या स्फोटा संदर्भात व जिवीतहानी बाबत अधिकृत माहिती मिळणार असल्याची माहिती शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांनी दिली आहे.

हेही वाचा;

Back to top button