औरंगाबाद : अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार; ५ जणांना अटक; गुन्हा दाखल

 सामूहिक बलात्‍कार
सामूहिक बलात्‍कार

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : देशवासीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राज्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जीवे मारण्याच्या धमक्या देत सहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आमानूष प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात विनयभंग, बलात्कार, पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्ताचा समावेश असून, इतर पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विधीसंघर्षग्रस्ताला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

कन्नड (जि.औरंगाबाद) तालुक्यातील खेडा आठेगाव येथील पीडिता इयत्ता नववीचे शिक्षण सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी आई बरोबर मोलमजुरीसाठी जात होती. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गावातील संशयीत तरुण आरोपी किरण साहेबराव गोंडे, अरुण कैलास दरेकर, श्रीकांत अशोक जाधव, सौरभ जगन जाधव, गोविंद नेमीचान शेळके हे वारंवार अल्पवयीन मुलीला धमकावत असत. तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत असत. १३ ऑगस्टला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पीडिता घरी असताना आरोपी किरण साहेबराव गोंडे व अरुण कैलास दरेकर हे दोघे आले. त्यांनी पीडितेला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. तसेच, या अगोदरही किरण साहेबराव गोंडे (३२), अरुण कैलास दरेकर (३१), श्रीकांत अशोक जाधव (३३), सौरभ जगन जाधव (१९), गोविंद नेमीचंद शेळके (२९) आणि 17 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक हे देखील सतत तिची छेड काढत होते.

त्यांनीही तिच्यावर वारंवार अत्याचार केले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने शनिवारी घडलेली घटना आपल्या आईच्या कानी घातली. तिच्या आईने कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन वरील संशयीत आरोपीं विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार तत्काळ ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव, सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव, फौजदार एस एस राजपूत, उपनिरीक्षक राम बारहाते, कन्नड ग्रामीण ठाण्याचे कर्मचारी, पिंक मोबाईल पथक यांनी घटनास्थळी भेट दिली.

१७ ऑगस्टपर्यंत कोठडी 

सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आरोपींमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असून, त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले. त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. उर्वरित पाच आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनवण्यात आली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मुकुंद आघाव हे करीत आहेत.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news