LIC मध्ये नोकरीची संधी! ४० वर्षे वयोमर्यादा, ८० हजार पगार | पुढारी

LIC मध्ये नोकरीची संधी! ४० वर्षे वयोमर्यादा, ८० हजार पगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय आयुर्विमा महामंडळात नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरूणांना सुवर्णसंधी आहे. LIC च्या गृहनिर्माण शाखेमध्ये सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापकच्या ८० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किमान २१ तर कमाल ४० वयोमर्यादा असलेल्या पदवीप्राप्त उमेदवारांकडून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

कोणत्याही विषयात पदवी प्राप्त विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात. सहायक प्रबंधक पदासाठी २१ ते ४० पर्यंत तर सहाय्यक पदासाठी २१ ते २८ वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. सहाय्यक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला ३३ हजार ९६० रुपये तर सहाय्यक प्रबंधक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ८० हजार वेतन मिळणार आहे.

असा करा अर्ज….

अर्हता प्राप्त उमेदवार भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या lichousing.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसह गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे.

परिक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया

८० पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेकरीता एकूण २०० प्रश्न व १२० मिनिटे वेळ असणार आहेत. यानंतर उमेदवारांची मुलाखत देखील घेतली जाणार आहे. सप्टेंबर ते ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button