सोलापूर : मंगळवेढा सबजेलमध्ये आरोपीने मफलरने घेतला गळफास | पुढारी

सोलापूर : मंगळवेढा सबजेलमध्ये आरोपीने मफलरने घेतला गळफास

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा : मंगळवेढ्यातील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने काल (सोमवार) मध्यरात्रीनंतर मफलरच्या साह्याने गळफास घेत आत्‍महत्‍या केली. सुनील तानाजी किसवे (वय 21 रा शिरनांदगी ता. मंगळवेढा) असे आरोपीचे नाव आहे. पॉस्को कायद्या अंतर्गत दीड महिन्यापूर्वी सदर आरोपीवर गुन्हा दाखल झाला होता.

येथील सबजेलमध्ये यापूर्वी आरोपी पळून जाण्याच्या घटना घडल्या आहेत, तर आरोपी समवेत बोकड पार्टी केल्याच्या घटनेने देखील मंगळवेढ्याचे सबजेल राज्यात चर्चेत आले होते. आता आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा हे जेल चर्चेत आले आहे. रात्री उशिरा नातेवाईकांच्या आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरला पाठवण्यात आला.
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया होईल. दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button