Sanjay Kumar Mishra : ‘ईडी’ प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ द्या, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका | पुढारी

Sanjay Kumar Mishra : 'ईडी' प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ द्या, केंद्राची सर्वोच्च न्यायालयात विनंती याचिका

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना मुदतवाढ देण्याची विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मिश्रा यांना तिसऱ्यांदा देण्यात आलेली मुदतवाढ बेकायदा असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघडणी केली होती. (Sanjay Kumar Mishra)

Sanjay Kumar Mishra : मिश्रा यांना मुदतवाढ दिली जावी

‘ईडी’चे प्रमुख मिश्रा हे ३१ जुलैनंतर पदावर राहू शकत नाहीत. असा निकाल न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने ११ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दिला होता. मिश्रा यांना मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली असून, त्यावर गुरुवारी (दि.२७) दुपारी साडेतीन वाजता न्यायालय सुनावणी घेणार असल्याचे साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले. ‘एफएटीएफ’ संस्थेकडून टेरर फंडिंगसंदर्भात तपास सुरु आहे व त्याची देखरेख मिश्रा करीत आहेत. हा विषय महत्वपूर्ण असल्याने मिश्रा यांना मुदतवाढ दिली जावी, असे गतवेळी केंद्राकडून न्यायालयाला सांगण्यात आले होते.

संजयकुमार मिश्रा हे १९८४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मिश्रा यांना वारंवार देण्यात आलेल्या मुदतवाढीला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मिश्रा यांना पहिली मुदतवाढ नोव्हेंबर २०१८ मध्ये देण्यात आली होती.

हेही वाचा 

Back to top button