

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी केली आहे. दरम्यान, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांनी परवानगी दिली आहे. (Parliament Monsoon Session) "मी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करेन आणि चर्चेसाठी योग्य वेळ तुम्हाला कळवीन." असे ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.
संपूर्ण देशात सध्या मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा चर्चेत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. दरम्यान, आज बुधवारी (दि. २६) विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संसदेत आतापर्यंत २७ वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. जुलै २०१८ मध्ये मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता. पण मोदी सरकारने त्यावेळी बहुमत सिद्ध केले होते. तरीही पुन्हा एकदा विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी मोदी सरकारला घेरले आहे. मणिपूरच्या मुद्यावरून वारंवार कामकाज तहकूब केले जात आहे. पीएम मोदी यांनी मणिपूर मुद्यावर आपले मौन सोडून संसदेत बोलावे या मागणीर विरोधक ठाम आहेत. तर गृहमंत्री अमित शहा मणिपूर मुद्यावर सभागृहात बोलतील असे सत्ताधाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरू आहे. दरम्यान, विरोधक मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव मांडण्याच्या तयारीत आहेत.
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशक आघाडी (इंडिया) संबंधित विरोधी पक्षांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीवर विशेष लक्ष केंद्रित करून भाजप सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय विरोधी पक्षाच्या आघाडीने घेतला आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी विरोधी पक्षांची भूमिका जाहीर केली होती. (Parliament Monsoon Session)
हे ही वाचा :