बदलापूर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले | पुढारी

बदलापूर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले

बदलापूर; पुढारी वृत्तसेवा :

बदलापूर शहरात सध्या घरफोडी, दुचाकी वाहन आणि रिक्षा चोरट्यांनी धुडगूस घातलेला असतानाच आता दुचाकीवरून येऊन गळ्यातील चैनी आणि मंगळसूत्र चोरले असल्याची घटना घडली आहे.

बदलापुरात विविध ठिकाणी दररोज अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. मात्र या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरल्याने मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलांना टारगेट करून हे चोरटे सर्रास पणे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोयी हुसकावून घेत आहेत. यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

गुरुवारी सकळी सव्वा सातच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या सुषमा साहेबराव पाटील ( वय 54 ) राहणार कृष्णाई अपार्टमेंट, मोहन व्हॅली समोर, बदलापूर पश्चिम या आपल्या सहकाऱ्यांसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असताना बदलापूर पश्चिम येथील हेंद्रेपाड्यातील चिंतामणी चौकातील गणेश मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैका मागे बसलेल्या इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरले पळ काढला.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन हे चोरटे या परिसरात रेकी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पोलिस या चोरट्यांना पकडण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याने मंगळसूत्र चोरटे आता दिवसाढवळ्या देखील महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील ऐवज लांबवत आहेत. या चोरी प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button