Latest
Sangli RTO : सांगलीत परप्रांतीय कामगाराकडून वाहतूक पोलिसाला मारहाण
सांगली येथील वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी ईरवंत यमलवाड यांना राजस्थान मधील परप्रांतीय कामगार उपमाराम जागडा याने मारहाण केली. येथील विश्रामबाग चौकात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. (Sangli RTO)
याबाबत जागडा याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी ईरवंत यमलवाड यांनी फिर्याद दिली आहे.
Sangli RTO : पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर धरल्यावर नागरिकांनी दिला चोप
पोलिसांनी सांगितले यमलवाड विश्रामबाग चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ड्युटीवर होते. त्यावेळी जागडा हा दुचाकीवरुन जात होता. त्याने मास्क न घातल्याने मास्क बाबत विचारले असता सरळ उत्तर दिले नाही. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना मागितला. तोही त्याने दिला नाही. उद्धट बोलून यमलवाड यांच्या कॉलर धरून धक्काबुक्की केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.
- T20 world cup 2021 : कोरा चेक तुमच्यासमोर टाकतो फक्त भारताला हरवा, उद्योगपतीने दिली पाकिस्तान क्रिकेट मंडळाला थेट ऑफर
- हिमाचलमध्ये भाजप च्या उमेदवारांच्या यादीत कंगना राणावत हिचं नावचं नाही; ती यादी फेक
- Jarandeshwar Sugar IT Raids : किरीट सोमय्यांच्या भेटीनंतर अवघ्या २४ तासांत जरंडेश्वरवर आयकरचे छापे
- bjp national executive : आशीष शेलार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चित्रा वाघ यांना संधी

