प्रशांत किशोर यांचा काँग्रेसवर कडाडून प्रहार ! काँग्रेस प्रवेशाच्या आशा मावळल्या ? | पुढारी

प्रशांत किशोर यांचा काँग्रेसवर कडाडून प्रहार ! काँग्रेस प्रवेशाच्या आशा मावळल्या ?

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

लखीमपूर खेरी घटनेनंतर भाजपवर तुटून पडलेल्या काँग्रेसला निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी लक्ष्य केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नाव न घेता त्यांनी हल्ला चढवला आहे.

प्रशांत किशोर यांनी असे लिहिले आहे की, जे लोक किंवा पक्ष ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ च्या मदतीने विरोधी पक्षाचे पुनरागमन होईल, असा विचार करत आहेत, ते गैरसमजात आहेत. त्यांच्या हाती फक्त निराश येईल. ते पुढे लिहितात की, दुर्दैवाने ‘ग्रँड ओल्ड पार्टी’ची मुळे आणि त्यांच्या संघटनात्मक रचनेत मोठ्या कमतरता आहेत. सध्या या समस्येवर कोणताही उपाय नाही.

पीकेंची टिप्पणी महत्त्वाची आहे कारण..

अनेक राजकीय पक्षांना सत्तेवर आणणाऱ्या प्रशांत किशोर यांचे हे ट्विट आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. अहवालांनुसार, बंगालच्या निवडणुकीनंतर, पीके काँग्रेसमध्ये सामील होतील अशी अटकळ होती, परंतु त्यांच्या ट्विटने सर्व अंदाजांना जवळजवळ पूर्णविराम दिला आहे.

प्रशांत किशोर अजूनही विरोधी पक्षाला भाजपशी स्पर्धा करण्यास योग्य मानत नाहीत. त्यांनी आधी एका निवेदनात म्हटले होते की पक्षांनी त्यांची संघटनात्मक रचना बदलण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत त्यांचे नवीन विधान निवडणुकीशी जोडले जात आहे.

पीके यांचे वक्तव्य काँग्रेससाठी धक्का आहे

लखीमपूर खेरी घटनेनंतर उत्तर प्रदेशातील हरवलेल्या जमिनीचा शोध घेत असलेल्या काँग्रेससाठी पीके यांचे विधान हा मोठा धक्का आहे. काँग्रेस पक्षाच्या मदतीने इतर राजकीय पक्षही विरोधकांना हवा देण्याचा प्रयत्न करत होते, पण पीके अजूनही काँग्रेसला विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यास सक्षम मानत नाहीत.

हे ही वाचलं का?

Back to top button