नाशिक : गॅस एजन्सीच्या तब्बल 39 गॅस टाक्यांची चोरी

नाशिक : गॅस एजन्सीच्या तब्बल 39 गॅस टाक्यांची चोरी

Published on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
येथील शहा ट्रेडर्सच्या ट्रकमधून अज्ञाताने 1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या 39 गॅस टाक्यांची चोरी केली. या प्रकरणी कर्मचारी संतोष कदम यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीची तक्रार दिली आहे. कमलनगर येथील शहा ट्रेडर्सच्या ट्रकमध्ये ठेवलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या 14 किलो वजनाच्या 39 गॅस टाक्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news