Uttarakhand avalanche Updates : हिमस्खलनात अडकलेल्या १५ गिर्यारोहकांची सुटका, २७ अजूनही बेपत्ता | पुढारी

Uttarakhand avalanche Updates : हिमस्खलनात अडकलेल्या १५ गिर्यारोहकांची सुटका, २७ अजूनही बेपत्ता

पुढारी ऑनलाइन डेस्क : Uttarakhand avalanche Updates : उत्तराखंडातील उत्तर काशी भागात द्रौपदीचा दांडा 2 या शिखरावर झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या गिर्यारोहकांपैकी 15 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर गिर्यारोहकांसह 27 जण अजूनही बेपत्ता आहे. बुधवारी आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या संयुक्त पथकाने यांची सुटका केली. मात्र, अजूनही शोध मोहिम सुरू आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मंगळवारी द्रौपदीचा दांडा 2 या शिखरावर हिमस्खलन झाले. यामध्ये नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग (NIM) च्या ६१ गिर्यारोहकांचा ताफा अडकला होता. (NIM)च्या प्रशिक्षण मोहिमेसाठी हे सर्व गिर्यारोहक येथे प्रशिक्षण घेत होते. यावेळी अचानक झालेल्या हिमस्खलनात सर्व गिर्यारोहक अडकले.

घटनेची माहिती मिळताच आयटीबीपी आणि एसडीआरएफच्या संयुक्त पथकासह लष्कराच्या मदतीने सुद्धा तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले. बुधवारी यापैकी 15 जणांची सुटका करण्यात आली. तर अजूनही 27 जण बेपत्ता आहेत.

Uttarakhand avalanche Updates : याआधी हाती आलेल्या वृत्तानुसार एकूण 10 जणांचे मृतदेह सापडले होते. कालच्या शोधमोहिमेदरम्यान आत्तापर्यंत चार मृतदेह सापडले आहेत, ज्यात NIM मधील दोन महिला शिक्षक – नौमी रावत आणि सविता कंसवाल यांचा समावेश आहे. इतर दोन मृतदेह हे प्रशिक्षणार्थींचे आहेत, मात्र त्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

सुमारे 18,000 फूट उंचीवर असलेल्या हिमस्खलनाच्या ठिकाणी असलेले खराब हवामान हे एक मोठे आव्हान असल्याचे शोध संस्थांनी सांगितले.

“उपलब्ध माहितीनुसार, बेपत्ता असलेले लोक 60-70 फूट खोल दरीत अडकले आहेत. बचावकर्त्यांचे पथक प्रथम घटनास्थळी पोहोचेल, परिस्थितीचे विश्लेषण करेल आणि त्यानंतर पुढे कसे जायचे याचा निर्णय घेईल. तथापि, अशा परिस्थितीत बचावाचा काळ अवघ्या काही तासांचा नसल्यामुळे जगण्याची आशा फारच अंधुक आहे,” असे ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
एनआयएमने बेपत्ता व्यक्तींची यादी जाहीर केली. त्यात 14 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत संस्थेत अॅडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्ससाठी नोंदणी केलेल्या आणि उत्तर प्रदेश, हिमाचल, हरियाणा, आसाम, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, आंध्र, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड या राज्यांतील लोकांचा तपशील समाविष्ट होता.

Uttarakhand avalanche Updates : दरम्यान, ITBP आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (SDRF) च्या 12 सदस्यीय उंच पर्वतारोहण पथकाने बुधवारी गटातील 15 जणांची सुटका केली. त्यांना मातली येथे विमानाने नेण्यात आले जेथे त्यांना प्रथमोपचारासाठी आयटीबीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना उत्तरकाशीला नेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये चार जण एनआयएमचे प्रशिक्षक आणि उर्वरित ११ जण प्रशिक्षणार्थी आहेत.

आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक पांडे म्हणाले, “बहुतेक वाचलेले अजूनही शॉकमध्ये आहेत. बेस कॅम्पवर आम्ही आमचे संपर्क केंद्र सुरू केले आहे. हवामान आणि इतर परिस्थिती लक्षात घेता, हे एक कठीण ऑपरेशन आहे, जे काही दिवस चालू राहू शकते.”

बेस कॅम्पवर तैनात असलेले आयटीबीपी, एसडीआरएफ आणि एनआयएमचे संयुक्त पथक बेपत्ता झालेल्या 27 व्यक्तींच्या शोधात द्रौपदी का दंडाच्या शिखराच्या काही मीटर खाली असलेल्या हिमस्खलनाच्या ठिकाणी ट्रेकिंग करणार आहे.

Uttarakhand avalanche Updates : अधिका-याने पुढे सांगितले की, “सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यात हवामान देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.” उल्लेखनीय म्हणजे, प्रादेशिक हवामान केंद्राने काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या काही भागांमध्ये ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा जारी केला होता.

हे ही वाचा :

Uttarakhand Accident : उत्तराखंडमध्ये वऱ्हाडाची बस दरीत कोसळली; मोठ्या जिवीतहानीची भीती

Uttarakhand Avalanche : उत्तराखंडमधील द्रौपदी दांडा शिखरावर हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू

Back to top button