गांधीनगरात दोन गटांत हाणामारी; 9 जणांवर गुन्हा | पुढारी

गांधीनगरात दोन गटांत हाणामारी; 9 जणांवर गुन्हा

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पळून जाऊन लग्न केल्याप्रकरणी एक महिन्याने पोलिस ठाण्यात जाताना दोन गटांत गांधीनगर नजीक मारामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांतील 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सूर्यकांत नागेश होसमनी (वय 29), चंद्रकांत नागेश होसमनी (वय 32), उलगप्पा साखरे (वय 40), बसवराज होसमनी, रवी सिद्राम पापस, निखिल मिलिंद माने (वय 22), मिलिंद पांडुरंग माने, बालाजी सुनील माने, शकुंतला मिलिंद माने (वय 41, सर्व रा. सोलापूर), अशा 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल नितेश काळे यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. एक महिन्यापूर्वी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून 23 जून रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सदर बझार पोलिस ठाण्यात दोन्ही गटांचे लोक जात होते. ते दोन्ही गट गांधीनगरजवळील कॅम्प शाळेजवळ समोरासमोर आले. तेव्हा दोन्ही गटांत शिवीगाळ व मारामारी झाली. यात दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात सुरेश होसमनी हे जखमी झाले.

Back to top button