वाहनातून गावठी दारूविक्री; आरोपी झाले फरार | पुढारी

वाहनातून गावठी दारूविक्री; आरोपी झाले फरार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
चर्होली येथील श्रीराम कॉलनीजवळ एका चारचाकीमधून गावठी हातभट्टी दारुची विक्री होत असून, पोलिसांनी छापा मारला असता वाहन आढळून आले.मात्र, आरोपी फरार आहे. ही घटना शुक्रवार (10 रोजी) रात्री अकरा वाजता घडली.

कोरोनाचा धोका वाढला, देशात २४ तासांत ८,५८२ नवे रुग्ण!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एमएच 12 बीपी 3642 क्रं.ची चारचाकी वाहन घेऊन आला होता. या वाहनांत तीस हजार रूपयांची प्रत्येक कॅनमध्ये दोन हजार रूपयांची, अशी पंधरा प्लॅस्टिक कॅन गावठी दारू भरून होती.

धक्कादायक ! पुण्यात महिलेचे अपहरण करून ट्रॅव्हल्स चालकाने केला बलात्कार

या दारूची विक्री सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या होत होती. पोलिसांना सुगावा लागताच आरोपी वाहन जागेवर ठेवून फरार झाला.
दिघी पोलिस ठाण्यात अवैध दारूची विक्री करणार्‍या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button