धक्कादायक ! पुण्यात महिलेचे अपहरण करून ट्रॅव्हल्स चालकाने केला बलात्कार | पुढारी

धक्कादायक ! पुण्यात महिलेचे अपहरण करून ट्रॅव्हल्स चालकाने केला बलात्कार

पुणे: पुढारी वृत्तसेवा

ट्रॅव्हल्स चालकाने स्वारगेट परिसरातून पुण्यात आलेल्या एका महिलेचे अपहरणकरून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोंग ( वय 38,रा.वडापुरी, इंदापूर) असे आरोपीचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून पती,पत्नी काम शोधण्यासाठी पुण्यात आले होते.त्यावेळी शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एस.टी स्टँड परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. आरोपी ट्रॅव्हल्स चालक आरोपी ने पीडित महिलेस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा,एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार,असे त्यांनी सांगितले.

मुसेवाला हत्याकांडातील संशयित संतोष जाधव अटकेत; गुजरातमधून ठोकल्या बेड्या

त्या आरोपीवर विश्वास ठेवून दोघे जण बस मध्ये आराम करण्यास गेले.तेवढ्यात पीडित महिलेचा पती बाथरूम करण्यासाठी गेला असता, आरोपीने काही क्षणात बस तेथून पळवून नेली आणि तू जर आरडा ओरड केल्यास तुला जीवे मारेल अशी धमकी दिली. स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला.त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पोलिसांनी आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे

Back to top button