

शेवगाव तालुका : पुढारी वृृत्तसेवा: पदचार्याला लुटणार्या टोळीतील पसार झालेल्या पाचपैकी चार आरोपींना शेवगाव पोलिसांनी गजाआड केले आहे. या संदर्भात इरफान रफिक शेख (वय 21), जहीर उर्फ जज्जा नवाज शेख (वय 20), सोमनाथ रामनाथ गवते (वय 22), अरबाज शहाबुद्दीन शेख (वय 21) या चार आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना मंगळवार (दि.14) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील फरार असलेल्या एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
फिर्यादी हे शनिवारी (दि.6) शेवगाव-नेवासा रस्त्यावरील बाँम्बे मशिनरी समोरुन रात्री 9.15 वाजता पायी चालले असता, त्यांच्यासमोर एका पल्सरवर तीन व स्कुटीवर दोनजण येऊन थांबले. त्यांच्याकडील अॅपल आयपॅड असलेली बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. पंरतु फिर्यादीने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेले.
याबात त्यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदिेवली होती. तेव्हापासून आरोपी फरार होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी तत्काळ गुन्ह्याचा तपास लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, आशिष शेळके, विश्वास पावरा या अधिकार्यांसह सहायक फौजदार भगवान बडधे, हवालदार पांडुरंग वीर, पुरुषोत्तम नाकाडे, प्रवीण बागूल, सुखदेव धोत्रे, अशोक लिपणे, सुधाकर दराडे, टेकाळे, महेश सावंत, बप्पासाहेब धाकतोडे, हरी घायतडक,वासुदेेव डमाळे, अस्लम शेख, संपत खेडकर, समीर फकीर, संतोष धोत्रे, चालक रवींद्र शेळके, सोमनाथ घुगे, संगिता पालवे, प्रियंका शिरसाठ आदींची तीन पथके तयार करून चार आरोपींना जेरबंद केले. दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.