एप्रिलमध्येच धरणीमाय पडली कोरडी! | पुढारी

एप्रिलमध्येच धरणीमाय पडली कोरडी!

आशिष देशमुख

पुणे : यंदा मार्च व एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात आलेल्या अतिउष्णतेच्या तीव्र लाटांनी जमिनीत खोलवरच्या मातीत जूनपर्यंत टिकणारे बाष्प एप्रिलमध्येच संपण्याची भीती हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

भोंग्यांबाबत आम्हाला कुणी अक्कल शिकवू नये : संजय राऊत

गेल्या अनेक वर्षांत राज्यात उष्णतेच्या लाटा आल्या, मात्र यंदाच्या लाटेचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दीर्घकाळ चालल्याने जमिनीतील खोलवरच्या बाष्पावरच त्याचा परिणाम झाला आहे. यंदा 15 मार्चपासूनच राज्यात उष्णतेचा कहर सुरू झाला. सरासरी तापमान 37 अंशांवर गेले. 21 ते 24 मार्च या कालावधीत पहिली उष्णतेची लाट आली. या काळात कमाल तापमानाचा पारा 42 अंशांवर गेला. त्यापाठोपाठ या हंगामातील सर्वात मोठा काळ ठरलेली उष्णतेची लाट आली ती 28 मार्च ते 11 एप्रिल अशी तब्बल 14 दिवस होती. त्यानंतरही राज्याचे तापमान सतत 40 अंशांवरच आहे. विदर्भातील अकोला शहराचे तापमान जागतिक यादीत पहिल्या दहा शहरांच्या यादीत यंदा सलग चार वेळा गणले गेले. या तीव्र लाटांच्या काळात खूप कमी वेळा पाऊस पडला व जमिनीची धूप वाढतच आहे, त्यामुळे जमिनीतील बाष्प एप्रिलमध्येच संपण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने उपग्रहाच्या सहाय्याने टिपलेल्या छायचित्राद्वारे व्यक्त केली आहे.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, २४ तासांत २,०६७ नवे रुग्ण, ४० मृत्यू

अमरावती : भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांना अटक

काय होणार परिणाम…

जमिनीतील बाष्प एप्रिलमध्येच कमी झाले, तर जूनमध्ये पेरणी करताना शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण जूनमध्ये शेती योग्य प्रकारे सुरू करण्साठी जमिनीत आवश्यक असलेली आर्द्रता शिल्लक राहणार नाही.

औरंगाबादला धोक्याचा इशारा

औरंगाबाद येथील आर्द्रता अवघ्या 25 टक्क्यांवर खाली गेल्याने या शहराला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. शहराचे तापमान 40 ते 41 अंशांवर असून आर्द्रता घटल्याने वातावरण अत्यंत शुष्क व कोरडे झाल्याने अतिनील (यूव्ही) किरणांचा धोका वाढला आहे.

न्यायालय : विधवा सुनेने दुसरे लग्न केले, तर मुलाच्या पेन्शनवर आई-वडिलांचा अधिकार

Back to top button