नाशिक : पोलिस आयुक्तांविषयी आपचे मुख्यमंत्र्यांना उपहासात्मक पत्र

पोलिस आयुक्त नाशिक, मुख्यमंत्री
पोलिस आयुक्त नाशिक, मुख्यमंत्री
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हप्ते घेऊन अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणार्‍यांवर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करणार का, अशी विचारणावजा मागणी करणारे उपहासात्मक पत्र आम आदमी पक्षाने दीपक पाण्डेय यांच्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

शनिवार (दि. 2) पासून होणार्‍या हेल्मेटसक्तीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी नाशिकने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत उपहासात्मक पत्र लिहिले आहे. पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानुसार, दुचाकी चालविणार्‍यासोबत मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे बंधनकारक केले असून, असे न केल्यास संबंधित दुचाकी वाहनधारकांस पेट्रोल देणार्‍या पेट्रोल पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने मागणी केली आहे की, काही जण हप्ते घेऊन अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे हप्ते घेणार्‍यांविरोधातसुद्धा हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी उपहासात्मक मागणी केली आहे.

आपने पत्रात म्हटले आहे की, पोलिस आयुक्तांच्या सर्व आदेशांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, पोलिस आयुक्तांना नाशिककरांच्या प्राणाची जिवापाड काळजी वाटते. जणू आजपर्यंतच्या एकाही पोलिस आयुक्तांना अशी काळजी यापूर्वी नाशिककरांची वाटली नाही. नाशिकमध्ये कितीही अवैध धंदे वाढले, चेन स्नॅचिंग, मटक्याचे अड्डे, जुगाराचे अड्डे वाढले, तरीही हेल्मेटसक्ती ही झालीच पाहिजे, असा अभूतपूर्व आग्रह कौतुकास पात्र आहे. अनेक ठिकाणी अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. चेन स्नॅचिंगच्या घटना होत आहेत.

अशा अवैध धंदे करणार्‍यांना राजाश्रय मिळत आहे. या सगळ्या बाबींकडे कोणीतरी हप्ते घेऊनच दुर्लक्ष करत असल्याने एक प्रकारे हप्ते घेणारे हे अवैध धंद्यांना प्रोत्साहन देऊन नाशिककरांचा जीव धोक्यात घालत आहेत आणि म्हणूनच हप्ते घेणार्‍यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपने केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news