गांधील माशी चावल्याने पोलिसाचा मृत्यू ; नाशिकच्या दिंडोरी पोलिस ठाण्यातील घटना | पुढारी

गांधील माशी चावल्याने पोलिसाचा मृत्यू ; नाशिकच्या दिंडोरी पोलिस ठाण्यातील घटना

नाशिक (दिंडोरी) : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलिस ठाण्यात यशवंत आनंदा भोये (52) हे कर्तव्यावर असताना त्यांना गांधील माशी चावल्याने त्यांचा मृत्यू झाला. हवालदार भोये हे गार्डची कामगिरी बजावत होते. त्या ठिकाणी त्यांना गांधील माशीने चावा घेतला, त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ दिंडोरी येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून मृत घोषित केले. दिंडोरी पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यशवंत भोये यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button