Philippines Typhoon : फिलिपाईन्समध्ये ‘राय’ च्रकीवादळामुळे २०८ जणांचा मृत्यू

Philippines Typhoon : फिलिपाईन्समध्ये ‘राय’ च्रकीवादळामुळे २०८ जणांचा मृत्यू
Published on
Updated on

फिलिपाईन्स, पुढारी ऑनलाईन : फिलिपाईन्समध्ये 'टायफून राय' नावाच्या (Philippines Typhoon) वादळामुळे २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही लोक बेपत्ता आहेत. नॅशनल पोलिसांनी सोमवारी सांगितले की, "यावर्षी फिलिपिन्समध्ये आलेल्या वादळामुळे मृतांची संख्या ही २०८ वर गेली आहे. टायफून राय नावाच्या वादळाने द्विपसमूहाच्या दक्षिण आणि मध्य भागात जास्त नुकसान झालेले आहे. त्यात २३९ लोकं जखमी झालेले आहेत. तर ५२ लोक बेपत्ता झालेले आहेत.

फिलिपाईन्समध्ये गुरुवारी आलेल्या सुपर टायफून राय या वादळाने शेकडो लोकांना बेघर केले. हे वादळ फिलिपिन्सला धडकल्यामुळे तब्बल ३ लाख लोकांना आपली घरे आणि समुद्र किनाऱ्यावरील हाॅटेल्सना सोडून जावे लागले. फिलिपाईन्स रेड क्राॅसने यापूर्वी वादळाच्या नुकसानीची सूचना दिलेली होती. या वादळामुळे घरे, रुग्णालये, शाळा आणि सार्वजनिक सभागृहांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार टायफून राय या वादळाने घर आणि रुग्णालयांवरील छतांचे नुकसान झालेले आहे. तसेच अनेक झाडे उन्मळून पडलेली आहे. विजेचे खांब कोसळलेले आहेत. लाकडांच्या घरांना तर उद्ध्वस्त केलेले आहे. काही गावांमध्ये पूर आलेले होते. प्रांत गव्हर्नर आर्थर याप यांनी आपल्या फेसबुक पेजवर बोहोल बेटाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली. चाॅकलेट हिल्स या भागात ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ताशी १९५ किलोमीटर या वेगाने हे वादळ पुढे सरकत आहे. त्यातून अतिवेगाने वारे वाहत असल्यामुळे सिरगाओ, दीनागट आणि मिंडानाओ बेटांवरही भीषण नुकसान झालेले आहे. २०१३ मध्ये सुपर टायफून हैयानच्या तुलना टायफून रायशी केली जात आहे. टायफून हैयान या वादळामुळे तब्बल ७३०० लोक मृत्यूमुखी पडलेले होते. सध्या काही भागांमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे, तर काही भागात विज ठप्प झालेली आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

पहा व्हिडीओ : गोदावरी महोत्सवाच्या निमित्ताने गोदाघाटाची सफर

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news