Tweet translate : एलॉन मस्क यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; ट्विटचे भाषांतर होणार

Tweet translate : एलॉन मस्क यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; ट्विटचे भाषांतर होणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटर युजर्सना ट्विटर वापरण्यात सुलभता यावी यासाठी नवनवीन बदल नेहमी करत असतात. अलिकडच्या काही काळात त्यांनी ट्विटरच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आज त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत माहिती दिली आहे. जाणून घ्या येत्या काळात ट्विटरमध्ये काय बदल (Tweet translate ) होणार आहेत.

Tweet translate : ट्विट भाषांतर आणि शिफारसही 

ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल होत आहेत. मस्क यांनी ट्विटर बाबतीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे ते सध्या नेहमीच चर्चेत आहे. त्यांनी ट्विटरची ब्ल्यू टीक सेवा, सर्वांसाठी पेड केली. या व्यतिरिक्त ट्विटरमध्ये वेगवेगळे फीचर आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. एडिट ट्विट, अन डू ट्विट असे काही नवीन फिचर्स लवकरच लाँच करण्याची घोषणा केली. ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन घेतलेल्या सदस्यांसाठी हे फीचर सुरुवातीला अॅक्टिवेट करण्यात आले. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरमध्ये आणखी एक महत्वपूर्ण फिचर आणणार असल्याची माहिती ट्विट करून दिली.

ट्विटरवर  जगभरातील युजर्स इंग्रजी व्यतिरिक्त आपल्या आपल्या भाषेत ट्विट करत आपला संदेश, माहिती शेअर करत असतात. आज त्यांनी ट्विटर वापरण्यात आणखी एक महत्तवपूर्ण बदल करणार असल्याचे सांगितले आहे.  त्यांनी ट्विट केले आहे की, "येत्या काही महिन्यांत, ट्विटर इतर देश आणि संस्कृतींमधील ट्विटर युजर्सच्या अप्रतिम ट्विटचे भाषांतर आणि शिफारस करेल. इतर देशांमध्ये दररोज नवनवीन ट्वीट्स असतात. खासकरुन जपानचे. शिफारस करण्यापूर्वी ट्विटचे भाषांतर केले जाईल. जगभरातील मनोरंजक माहिती पाहण्यासारखी आहे."

Tweet translate : युजर्सच्या संमिश्र भावना

मस्क यांच्या या ट्विटला युजर्सचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ट्विट भाषांतर होणार या निर्णयाचे स्वागत करत आहेत. तर इतर ट्विट शिफारसच्या निर्णयावर काही यूजर्स नाराजी व्यक्त करत आहेत. आता ट्विटर युजर्सना एलॉन मस्क कधी हा बदल करणार याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news