आता नव्या तीन रंगांत ट्विटर अकाऊंट | पुढारी

आता नव्या तीन रंगांत ट्विटर अकाऊंट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : तुम्ही ट्विटर युझर्स आहात आणि अनेक दिवसांपासून ट्विटर अपडेटेड अकाऊंट व्हेरिफिकेशन प्रोग्रॅमची वाट पाहत असाल, तर आनंदाची बातमी आहे. आता अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटर रिलाँच केले आहे. यामध्ये व्हेरिफाईड अकाऊंटसाठी तीन रंगांचा वापर केला आहे. रंगाची वेगवेगळ्या गटांत विभागणी केली आहे.

यासंदर्भात मस्क यांनी सांगितले की, सोनेरी रंग व्हेरिफाईड टिक कंपन्यांसाठी, सरकारी कार्यालयाशी संबंधित असलेल्या अकाऊंटसाठी करडा रंग आणि वैयक्तिक अकाऊंटसाठी निळा रंग उपलब्ध केला आहे. अकाऊंट मॅन्युअली प्रमाणित केले जाणार असून अकाऊंटमध्ये काही त्रुटी आढळल्यास अकाऊंट व्हेरिफाईड केले जाणार नाही. ऑफिशिअलसारखे टॅग मर्यादित असून ते सर्वांना दिले जाणार नसल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले.

Back to top button