Twitter New CEO : शिवा अय्यादुराईंना व्हायचंय ट्विटरचा सीईओ; मस्क यांना ट्विट करत विचारलं.... | पुढारी

Twitter New CEO : शिवा अय्यादुराईंना व्हायचंय ट्विटरचा सीईओ; मस्क यांना ट्विट करत विचारलं....

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय-अमेरिकन असलेले शिवा अय्यादुराईं यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटचा सीईओ व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटरला ट्विट केले आहे आणि ट्विटरचे विद्यमान सीईओ एलन मस्क यांना टॅग केल आहे. आपण घेतलेल्या शिक्षणाचाही त्यांनी या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. (Twitter New CEO) तर सीईओ पदासाठी अर्ज करायचा असेल तर कोणती प्रक्रिया हेही विचारलं आहे.

ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटची मालकी त्याचबरोबर टेस्लाचे मालक  एलन मस्क यांच्याकडे आल्यापासून ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. १९ डिसेंबरला त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर  एक पोल घेतला होता. त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, आपण ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार व्हावे का? जो काही निकाल येईल त्याचे मी पालन करेन. या पोलवर ५७.५% लोकांनी ‘हो’ असे उत्तर दिले होते. तर ४०.५ % लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. (२६ डिसेंबर पर्यंत) हे ट्विट करत त्यांनी नव्या सीईओच्या शोधात असल्याचे संकेत दिले आहेत.

मस्क यांच्या या पोलला अनेकांनी कमेंट्स करत प्रतिसाद दिला. अनेकांनी आपण या पदासाठी इच्छूक असल्याचेही सांगितले. जगातील सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर मिस्टर बीस्ट यांनीही आपण ट्विटरचा सीईओ होण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले. याला उत्तर देताना मस्क यांनी म्हटलं होतं की, “मी लवकरच, ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देईल, पण मला त्यासाठी माझ्यासारखाच वेडा माणसाचा शोध आहे. त्यानंतर मी ट्विटरच्या टीमसोबत काम करेन.”

कृपया अर्ज करण्याची प्रक्रिया सांगा

भारतीय-अमेरिकन असलेल्या शिवा अय्यादुराई (Dr.SHIVA Ayyadurai) यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट करत आपण ट्विटरचा नवा साईओ होण्यास इच्छूक असल्याचं सांगितलं आहे. ट्विटमध्ये शिवा यांनी ट्विटरचे विद्यमान साईओ एलन मस्क यांनाही टॅग केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की,” मी ट्विटरचा सीईओपदी येण्यास इच्छूक आहे. माझ्याकडे MIT मधून घेतलेल्या एकूण 4 डिग्री आहेत आणि मी आतापर्यंत एकूण 7 हाय-टेक सॉफ्टवेअर कंपन्या स्थापन केल्या आहेत. कृपया तुम्ही मला या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सांगा”.

Twitter New CEO : कोण आहेत शिवा अय्यादुराई

उच्चविद्याविभूषित असलेले शिवा अय्यादुराई यांचा जन्म मुंबईमधील एका तमिळ कुटूंबात झाला. ते वयाच्या सातव्या वर्षी अमेरिकेला गेले. त्यांनी एमआयटी (MIT-Massachusetts Institute of Technology) मधून एकूण 4 पदव्या घेतल्या आहेत. आतापर्यंत एकूण 7 हाय-टेक सॉफ्टवेअर कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यांनी आपण ईमेलचा शोध लावल्याचाही दावा केला आहे. १९७८ मध्ये त्यांनी एक संगणक प्रोग्राम केला. जो आता ईमेल म्हणून ओळखला जातो. अमेरिका सरकारने शिवा अय्यादुराई यांना ३० ऑगस्ट १९८२ मध्ये ईमेलचा शोधकर्ता म्हणून जाहीर केले. तर १९७८ मध्ये ईमेलचा पहिला यूएस कॉपीराइट दिला.

हेही वाचा

Back to top button