Twitter Business Feature: ट्विटरमध्ये जबरदस्त फिचरची एंट्री, एलॉन मस्क यांनी केले टिमचे कौतुक | पुढारी

Twitter Business Feature: ट्विटरमध्ये जबरदस्त फिचरची एंट्री, एलॉन मस्क यांनी केले टिमचे कौतुक

पुढारी ऑनलाईन: ट्विटर हा सोशल मीडिया ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काही ना काही कारणाने नेमीच चर्चेत आहे. यापूर्वी ट्विटरने ब्ल्यू, गोल्ड आणि ग्रे रंगात त्यांचा व्हेरिफिकेशन प्रोग्राम लॉन्च केला होता. आता ट्विटरने पुन्हा एक नवीन फिचर आणले आहे. हे फिचर खास गुंतवणूदार, व्यापारी, आर्थिक तज्ज्ञ आणि संस्थांसाठी असणार आहे. याच्या माध्यमातून यूजर्संना एकाच तक्त्यात बिटकॉइन आणि इथरियम या क्रिप्टोचे स्टॉक चार्ट आणि आलेख पाहता येणार आहे. याबद्दल एलॉन मस्क यांनी हे फिचर बनवणाऱ्या टीमचे कौतुक केले आहे.

नवीन फिचर ‘असे’ करेल काम

ट्विटर बिझनेसने ट्विट करत याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये सांगितल्यानुसार, जेव्हा यूजर्स मोठ्या स्टॉकच्या चिन्हासमोर “$” असे लिहून ट्विट करेल, तेव्हा तो स्टॉक आपोआप क्लिक करण्यायोग्य होईल. यावर क्लिक केल्यानंतर तो यूजर्सला त्याच्या किंमती, आलेखासह त्या स्टॉकच्या शोध परिणामांवर घेऊन जाईल. आणि इतर डेटा देखील उपलब्ध करून देईल.

ट्विटर बिझनेसने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, युजर्स ट्विटमधील $ हे चिन्ह टाईप न करता, लिंकवर क्लिक न करता थेट चिन्ह शोधू शकतात. $ चिन्हासह आणि $ चिन्हाशिवाय यूजर्स क्रिप्टोकरन्सी शोधू शकतात, असे म्हटले आहे.

Twitter: व्हेरिफिकेशन प्रोग्राम

ट्विटरने काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हेरिफिकेशन प्रोग्राम लॉन्च केला होता. यामध्ये व्हेरिफाईड अकाउंट्सची ब्ल्यू, गोल्ड आणि ग्रे रंगाचे विभागणी करण्यात आली होती. यामध्ये ट्विटरने बिझनेस व्हेरिफिकेशन ब्रँड्ससाठी गोल्ड टिक, राजकीय किंवा सरकारी संस्थांसाठी ग्रे टिक तर ब्ल्यू टिक हे सर्वसामान्य किंवा सेलिब्रेटी व्यक्तींसाठी कंपनीने उपलब्ध करून दिले आहे.

हेही वाचा:

Back to top button