सॅन फ्रान्सिस्को: वृत्तसंस्था : ट्विटर मुख्यालयातील अनावश्यक साठवून ठेवलेल्या वस्तूंचा ऑनलाईन लिलाव (Twitter auction) करण्यात येत आहे. त्यात ट्विटरचा साईन बोर्ड, कॉफी मशिन, काही टेबल, खुर्च्या, के ९५ मास्क अशा अनेक वस्तू आहेत. या लिलावाची घोषणा होताच अनेकांनी बोली लावण्यास सुरुवातही केली.अॅलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर कंपनीत प्रचंड उलथापालथी सुरू आहेत. अशातच ट्विटर खरेदी केल्याने मस्क यांची मालमत्ता घटल्याची बातमी नुकतीच आली होती. तसेच कार्यालयाच्या जागेचे भाडे थकवल्याचीही बातमी मध्यंतरी आली होती. त्यामुळे लिलावाची माहिती कळताच, अनेकांनी मस्क यांची सोशल मीडियावर टिंगलही केली.
प्रत्यक्षात कॉर्पोरेट कार्यालयातील अनावश्यक वस्तूंची विक्री करण्यात येत आहे. या वस्तूंचा लिलाव हेरिटेज ग्लोबल पार्टनर्स या कंपनीने जाहीर केला आहे. या वस्तूंमध्ये पक्ष्याचे चित्र असलेले साईन बोर्ड, एस्प्रेसो कॉफी मशिन, व्हाईट बोर्ड, टेबल, खुर्च्या, के ९५ मास्कची १०० खोकी, आय मॅक, डिझायनर खुर्च्या, ट्रिटरचे बोधचिन्ह असलेल्या पक्ष्याचे शिल्प यांचा समावेश आहे. यातील बहुतांश वस्तूंवर ट्विटरचा लोगो असल्याने स्मृतिचिन्ह म्हणून या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक इच्छुक पुढे येत आहेत.
हेही वाचा