रश्मी रॉकेट : बॉडीवरून टीका करणाऱ्यांना तापसी पन्नूचे खडेबोल

रश्मी रॉकेट : बॉडीवरून टीका करणाऱ्यांना तापसी पन्नूचे खडेबोल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तापसी पन्नूच्या रश्मी रॉकेट या चित्रपटाचा रिलीज झाला आहे; दुसरीकडे मात्र ट्रोलर्सनी तिच्यावर टीकेचा भडीमार केलाय. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिला मर्दानी, शी-मॅन, ट्रान्सजेंडर म्हणत तिच्यावर टीका होऊ लागली. पण, गप्प बसेल ती तापसी कसली? तिने ट्रोलर्सना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

कुणी तिला तुझी पुरुषासारखी बॉडी आहे तर कुणी ट्रान्सजेंडर म्हटलं. एकाने तर हेदेखील लिहिलं की, पुरुषासारखी दिसतेस. जेंडर चेंज करण्याचा तर विचार नाहीये ना तुझा?… यासारख्या टीका ट्रोलर्सनी केल्या. मग काय? ती भडकली. तिनेही सडेतोड उत्तर दिलं.

तापसी म्हणते-

तापसीने लिहिलं की- 'माझ्याकडून आपल्या सर्वांचे मनापासून आभार. परंतु, अशा अनेक मुली आहेत. कुठल्याही कमेंटविना त्यांची कुठलीही चूक नसताना रोज ऐकतात. त्या सर्व ॲथलीट्सना सलाम. जे खेळ आणि देशासाठी आपलं रक्त-घाम गाळतात. परंतु, त्यानंतरही त्यांना हे सर्व ऐकून घ्यावं लागतं.

रश्मि रॉकेट चित्रपट आकर्ष खुरानाने दिग्दर्शित केलाय. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा प्रीमियर झी5 होणार आहे.

कच्छ मधील एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची ही कथा आहे.

तिच्याकडे धावण्याची एक अविश्वसनीय अशी शक्ती आहे. 'रश्मी रॉकेट' नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे.

यामध्ये 'रश्मी रॉकेट'ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि व्यावसायिक रूपाने स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळते. मात्र, तिला हेही जाणवते की फिनिश लाइन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे आहेत.

अखेरीस ही एथलेटिक स्पर्धा सन्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत रूपांतरित होते.

चित्रपटाच्या शीर्षकाला न्याय देत, 'रश्मि रॉकेट'चे ट्रेलर नायिका आणि तिच्या रश्मी रॉकेट बनण्याच्या यात्रेची प्रेरक कहानी दाखवते.

प्रभावी संवाद, भावना आणि तापसीचे अभिनय कौशल्यासोबत पुरेपूर नाट्य असलेला हा चित्रपट आहे.

तिच्यासोबत या चित्रपटात तितकेच प्रतिभाशाली सहायक कलाकार आहेत.

आकर्ष खुराना म्हणतात –

दिग्दर्शक आकर्ष खुराना म्हणतात की, जेव्हा प्रांजल आणि तापसी माझ्याकडे नंदा यांच्या या कथेची कल्पना घेऊन आले. तेव्हा मी चकित झालो. कारण हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये खूप काही आहे. ती भावनात्मक आणि मनोरंजक आहे. पण, काही गंभीर मुद्द्यांना स्पर्श करण्याची संधी दिली. मी हा चित्रपट करण्यापासून थांबूच शकत नव्हतो. तो लोकांसमोर आणण्यापासून मी स्वतःला रोखू शकत नाही.

हेही वाचलं का ?

पाहा व्हिडिओ- Rashmi Rocket | Official Trailer | A ZEE5 Original Film | Premieres 15th Oct 2021 on ZEE5

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news