

लंडन; पुढारी ऑनलाईन : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला इंग्लंडमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ऋषभ पंतने आठ दिवसांपूर्वी कोरोना चाचणी केली होती. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. पंत बरोबरच स्टाफमधील दोन जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच वृध्दीमान साहा आणि गोलंदाजी प्रशिक्षक देखील विलगीकरणात आहेत.
ऋषभ पंत भारतीय संघाबरोबर प्रवास करत नाही आहे. भारतीय संघ डरहममध्ये सराव सामना खेळणार आहे. भारतीय संघ ऑगस्टमध्ये इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऋषभ पंतने १३ मे रोजी कोरोना लसीचा आपला पहिला डोस घेतला होता.
अधिक वाचा :
पंत आपल्या मित्रांसोबत वेमब्ले स्टेडियमवर युरो कपचा इंग्लंड विरुद्ध जर्मनी सामना पाहण्यासाठी गेला होता. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर २० दिवसांचा ब्रेक देण्यात आला होता.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघातील इतर कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण झालेली नाही.
अधिक वाचा :
ते म्हणाले की, 'होय एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहेत. पण, तो गेल्या आठ दिवसापासून विलगीकरणात आहे. तो इतर खेळाडूंबरोबर हॉटेलमध्ये राहत नव्हता. त्यामुळे इतर कोणतेही खेळाडू प्रभावित झालेले नाहीत.'
भारतीय संघ डरहम येथे सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना जुलै २० रोजी सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका पुढच्या महिन्यात सुरु होणार आहे. या मालिकेबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दुसरे सायकल सुरु होत आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ :