Pahalgam Terror Attack : मुंबई, हैदराबादचे संघ काळ्या पट्ट्या बांधून उतरले मैदानात! पहलगाम हल्ल्यावर पॅट कमिन्स-हार्दिक पंड्या म्हणाले..

पंड्या आणि कमिन्स या दोन्ही कर्णधारांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
IPL 2025 SRH vs MI Pahalgam Terror Attack
Published on
Updated on

IPL 2025 SRH vs MI Pahalgam Terror Attack Pay Homage To Victims

हैदराबाद : जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने बुधवारी होणाऱ्या आयपीएल सामन्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. 23 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना सुरू झाला तेव्हा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.

सामना सुरू होण्यापूर्वी मुंबईचा कर्णधार पंड्या आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स टॉससाठी आले. मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही कर्णधारांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

IPL 2025 SRH vs MI Pahalgam Terror Attack
'IPL'मध्‍येही होणार दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध! खेळाडू-पंच काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार
IPL 2025 SRH vs MI Pahalgam Terror Attack
IPL गाजवणा-या क्रिकेटपटूची हुंड्यासाठी पत्नीला मारहाण-शिविगाळ!

हार्दिक पांड्या काय म्हणाला?

पंड्या म्हणाला की, ‘सर्वप्रथम मी दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त करू इच्छितो. आम्ही एक संघ म्हणून आणि एक फ्रँचायझी म्हणून अशा कोणत्याही हल्ल्यांचा निषेध करतो,’ असे सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘टॉस जिंकल्यानतर प्रथम गोलंदाजी करणार आहे. खेळपट्टी चांगला दिसत आहे. आम्ही संघात फक्त एक बदल केला आहे. अश्विनीची जागा विघ्नेश घेईल. खेळ शक्य तितका सोपा करण्याची आमची योजना आहे.’

‘आमच्यासाठीही खूप दुःखद गोष्ट’ : पॅट कमिन्स

पॅट कमिन्स म्हणाला, ‘पहलगाम दहशतवादी हल्ला ही आमच्यासाठीही खूप दुःखद गोष्ट आहे. आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,’ अशी भावना त्याने व्यक्त केली. संघात एक बदल करण्यात आल्याचेही त्यांने यावेळी सांगितले. मोहम्मद शमीच्या जागी जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

IPL 2025 SRH vs MI Pahalgam Terror Attack
BAN vs ZIM Test Series : झिम्बाब्वेने 4 वर्षांनी कसोटी जिंकली! 6 वर्षांनी बांगला देशला त्यांच्याच घरात धूळ चारली
IPL 2025 SRH vs MI Pahalgam Terror Attack
KL Rahul IPL Rcord : केएल राहुल IPLमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा फलंदाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news