पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला. या घटनेने संपूर्ण देशभरात संतपाचाी लाट उसळली आहे. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल २०२५ च्या सामन्यादरम्यान खेळाडू आणि पंच काळ्या हातावर पट्ट्या बांधून मैदानावर उतरतील.
सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू आणि पंच काळ्या पट्ट्या बांधतील, तर सामना सुरू होण्यापूर्वी एक मिनिटाचे मौन पाळले जाईल. या सामन्यासाठी मैदानावर कोणतेही चीअरलीडर्स नसतील. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल क्रीडा जगतानेही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी सोशल मीडियावर पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील बैसरन येथे मंगळवारी (दि.२१) दुपारी २.३० वाजता दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला ठरा आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २८ पर्यटकांपैकी युएई आणि नेपाळमधील नागरिकांचाही समावेश आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सुमारे ८-१० दहशतवादी सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यापैकी ५-७ दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचा संशय आहे.