KL Rahul IPL Rcord : केएल राहुल IPLमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा फलंदाज

KL Rahul ने लखनौविरुद्ध षटकार मारत दिल्लीला आयपीएल 2025 मधील दुसरा विजय मिळवून दिला.
KL Rahul IPL 2025
Published on
Updated on

KL Rahul Complete 5000 IPL Runs : केएल राहुलचा नवा विक्रम जाणून घ्या

नवी दिल्ली : आयपीएल 2025 आता अतिशय रोमांचक टप्प्यावर पोहोचले आहे. सर्व संघांमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्याची लढाई तीव्र झाली आहे. मंगळवारी (22 एप्रिल) लखनौ येथे खेळल्या गेलेल्या हंगामातील 40 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह हा संघ 12 गुण मिळवून पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता ते प्लेऑफमध्ये पोहोचण्यापासून फक्त दोन विजय दूर आहेत. या सामन्यात, एलएसजीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली आणि स्कोअरबोर्डवर 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात, केएल राहुलच्या नाबाद 57 धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर डीसीने 13 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.

राहुलने रचला इतिहास

केएल राहुलने लखनौविरुद्ध षटकार मारत दिल्लीला आयपीएल 2025 मधील दुसरा विजय मिळवून दिला. या सामन्यात केएलने 42 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह, त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला. त्याने ही किमया सर्वात कमी 130 डावांमध्ये डावांमध्ये केली. यापूर्वी हा विक्रम डेव्हिड वॉर्नच्या नावावर होता, ज्याने 135 डावांमध्ये हा पराक्रम केला होता. तर विराट कोहलीने इतक्या धावा करण्यासाठी 157 डाव खेळले होते.

KL Rahul IPL 2025
के. एल. राहुलने दाखवला लखनौला इंगा
KL Rahul IPL 2025
IPL गाजवणा-या क्रिकेटपटूची हुंड्यासाठी पत्नीला मारहाण-शिविगाळ!

IPL मध्ये सर्वात कमी डावांमध्ये 5000 धावा करणारे खेळाडू

  • केएल राहुल : 130 डाव

  • डेव्हिड वॉर्नर : 135 डाव

  • विराट कोहली : 157 डाव

  • एबी डिव्हिलियर्स : 161 डाव

  • शिखर धवन : 168 डाव

  • सुरेश रैना : 173 डाव

  • रोहित शर्मा : 187 डाव

  • एमएस धोनी : 208 डाव

KL Rahul IPL 2025
IPL 2025 : हर्षा भोगले, सायमन डूल यांना ईडनवर बंदी घाला
KL Rahul IPL 2025
IPLमध्ये ‘या’ 5 कोट्यधीश खेळाडूंचा उडाला फज्जा! अर्धा हंगाम संपला तरी मैदानातून ‘गायब’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news