Rohit Sharma MI Captain : मी तयार नव्‍हतो; पण...;मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर पुन्हा परतण्याबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा

संघाला नेतृत्व म्हणून माझीच गरज आहे, असे मी म्हणत नाही; पण सध्या संघाला एका ठोस दिशेची गरज आहे.
Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027
Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027
Published on: 
Updated on: 

Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027 : टीम इंडियाचा वनडेमधील स्टार फलंदाज रोहित शर्मा तीन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) २०२७ च्या हंगामापूर्वी शुक्रवारी (दि. २७) त्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. संघाला पाचवेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितने पुन्हा एकदा कर्णधारपद कसे स्वीकारले याबाबत आता मोठा खुलासा केला आहे.

मुंबई इंडियन्सकडून लौकिकाला साजेशी कामगिरी नाही

रोहितच्‍या नेतृत्त्‍वाखाली मुंबई इंडियन्‍सने पाचवेळा विजेतेपद पटकावले होते. मात्र २०२० मध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर या संघाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये मुंबईचा संघ पाचव्या, तर २०२२ मध्ये दहाव्या (शेवटच्या) स्थानी राहिला. २०२३ मध्ये संघाने 'क्वालिफायर-२' पर्यंत मजल मारली, मात्र त्यानंतर व्यवस्थापनाने नेतृत्वात बदल करत रोहितच्या जागी हार्दिक पंड्याकडे धुरा सोपवली. या बदलानंतरही चित्र कायम राहिली. २०२४ मध्ये मुंबई पुन्हा दहाव्या स्थानी फेकला गेला, २०२५ मध्ये क्वालिफायर-२ खेळला आणि २०२६ चा हंगाम नवव्या स्थानावर संपवला.

Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027
Kapil Dev : "तो विनोद कांबळीसारखा गायब न व्हावा..." : वैभव सूर्यवंशीबाबत माजी क्रिकेटपटू कपिल देव नेमकं काय म्हणाले?

सुरुवातीला माझा प्रामाणिक विचार हाच होता की....

सुरुवातीला ही जबाबदारी पुन्हा स्वीकारण्याबाबत आपण साशंक असल्याचे प्रांजळपणे मान्य केले आहे. एका मुलाखतीत रोहित म्हणाला की, "सुरुवातीला माझा प्रामाणिक विचार हाच होता की, मी सध्या यासाठी तयार नाही. गेल्या काही काळात बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, त्यामुळे मला यावर थोडा वेळ देऊन विचार करण्याची गरज होती. मी त्या मानसिकतेत आहे की नाही, हे मलाच कळत नव्हते."

सध्या संघाला एका ठोस दिशेची गरज

अखेर संघाला पुढे नेण्यासाठी कोणाची तरी गरज असल्याचे जाणवले. "आतून अशी भावना आली की, या संघाला नेतृत्व म्हणून माझीच गरज आहे, असे मी म्हणत नाही; पण सध्या संघाला एका ठोस दिशेची गरज आहे. ती दिशा देण्याचे काम माझ्याकडून होणार असेल, तर या संघाला पुढे नेण्यात मला नक्कीच आनंद होईल," असेही रोहितने स्पष्ट केले.

Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027
Rohit Sharma MI captain : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा 'हिटमॅन' राज! रोहित शर्मा कर्णधारपदी विराजमान, फ्रँचायझीची मोठी घोषणा

संघाच्‍या अपयशात एक-दोन खेळाडूंचा दोष नव्हता

"खेळाडूंवर असलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या जात नव्हत्या. तुम्ही सतत हरत असता तेव्हा प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर दबाव टाकतात. आम्ही त्या दबावाचा सामना करू शकलो नाही. एक-दोन खेळाडूंचा दोष नव्हता, तर संपूर्ण मुंबई इंडियन्स संघच अपयशी ठरत होता," असे परखड मत त्याने मांडले.

मी विचार करू लागलो की, हा तो संघ नाही..

मागील काही वर्षांतील संघाच्या सातत्याने झालेल्या पडझडीबाबत अनेक खेळाडू अस्वस्थ होते. "या वर्षीचा आयपीएलचा हंगाम संपला तेव्हा आम्ही अत्यंत निराशाजनक खेळ केला होता. केवळ मीच नाही, तर इतर अनेक खेळाडूही आमच्या खेळाच्या पद्धतीवर नाराज होते. मी घरी गेलो आणि विचार करू लागलो की, एकेकाळी असणारा हा तो संघ नाही. पुन्हा अग्रस्थानी जाण्यासाठी काय करावे लागेल? ते कसे शक्य होईल? जेव्हा तुम्ही यशाचे मोठे शिखर गाठता, तेव्हा त्यानंतर थोडी घसरण होणे हे कोणत्याही संघाबाबत स्वाभाविक असते," असेही रोहितने सांगितले. "गेल्या पाच हंगामांत मुंबईचा संघ तीन वेळा गुणतालिकेत तळाशी राहिला. तीन हंगामांत मुंबईला तळाशी पाहणे वेदनादायक होते. २०२२ मध्ये माझ्या नेतृत्वाखालीही असे घडले, त्यानंतर २०२४ आणि २०२६ मध्येही तेच झाले. हा खरा मुंबई इंडियन्स नाही. या कामगिरीसाठी मुंबई इंडियन्स ओळखला जात नाही," असेही रोहित म्हणाला.

Rohit Sharma Mumbai Indians Captain IPL 2027
Ajit Agarkar: BCCI मध्ये मोठी उलथापालथ होणार; रोहित शर्मा वादामुळे आगरकर OUT? VVS लक्ष्मणची एन्ट्री होणार?

पत्नीशी केली सविस्तर चर्चा

आकाश अंबानी आणि व्यवस्थापनातील इतर सदस्यांची भेट घेण्यापूर्वी आपण पत्नीशी परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. "त्यानंतर मी आणि आकाश भेटलो. संघाला पुढे कसे न्यायचे, काय बदल करता येतील यावर आमची सविस्तर चर्चा झाली आणि अनेक चांगल्या कल्पना समोर आल्या," असेही रोहितने स्पष्ट केले.

...त्यामुळे स्वीकारली पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी

गेल्या दशकभराहून अधिक काळ निभावलेली जबाबदारी आणि फ्रँचायझीशी असलेले नाते यामुळे कर्णधारपदाच्या प्रस्तावावर विचार करणे भाग पडले. "इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला जाणवले की, मी हा संघ स्वतः घडवला आहे. दहा वर्षे संघाचे नेतृत्व केले आहे. पुन्हा एकदा हे आव्हान स्वीकारून प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे," असेही रोहित शर्माने स्पष्ट केले.

मी कर्णधार झालो म्हणून सारं काही बदलणार नाही

"मी असे म्हणणार नाही की, मी पुन्हा कर्णधार झालो त्यामुळे सर्व काही बदलेल. कोणत्याही संघाचे नेतृत्व करणे सोपे नसते आणि आयपीएलमध्ये तर ते सर्वात कठीण असते, कारण इथे वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळत असतात. आता चाहत्यांना आनंद साजरा करण्याचे अनेक क्षण देण्यासाठी मी सज्ज आहे. आमच्या नैसर्गिक शैलीत क्रिकेट खेळण्यावर, एक संघ म्हणून लढण्यावर आणि खेळाचा आनंद घेण्यावर आमचा भर असेल," असेही रोहित शर्माने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.