Ajit Agarkar: BCCI मध्ये मोठी उलथापालथ होणार; रोहित शर्मा वादामुळे आगरकर OUT? VVS लक्ष्मणची एन्ट्री होणार?

Ajit Agarkar Chief Selector: रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वादानंतर बीसीसीआयमध्ये अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Ajit Agarkar Rohit Sharma
Ajit Agarkar Rohit SharmaPudhari
Published on
Updated on

Ajit Agarkar Chief Selector: भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (BCCI) मोठ्या बदलांची चर्चा सुरु आहे. भारताचे निवड समितीचे सध्याचे अध्यक्ष अजित आगरकर यांचे पद धोक्यात आल्याची चर्चा असून, त्यांच्या जागी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी, विविध माध्यमांमध्ये याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

आगरकर यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह

अजित आगरकर यांनी जुलै 2023 मध्ये निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांचा मूळ कार्यकाळ जून 2026 मध्ये संपला होता. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून, ती सप्टेंबर 2026 मध्ये संपणार आहे.

यापूर्वी त्यांचा कार्यकाळ सहजपणे वाढवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अलीकडील काही घडामोडींमुळे बीसीसीआय या निर्णयाचा फेरविचार करत असल्याचे वृत्त आहे.

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चेचा परिणाम?

माध्यमांतील वृत्तांनुसार, रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतच्या चर्चेमुळे बीसीसीआयमध्ये नाराजी निर्माण झाली. काही अहवालांमध्ये रोहित 2027 विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार असल्याचे म्हटले गेले होते. तसेच संघ व्यवस्थापन त्याला पुढील विश्वचषकासाठी खेळू देणार नसल्याच्याही चर्चा आहे.

मात्र, या सर्व चर्चांना रोहित शर्माने मैदानातच उत्तर दिले. इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने 138 धावांची शानदार खेळी करत सर्व अफवांना पूर्णविराम दिला.

Ajit Agarkar Rohit Sharma
Auqib Nabi : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात बुमराहच्‍या जागी जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीला संधी

व्हीव्हीएस लक्ष्मण आघाडीवर?

आगरकर यांचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे नाव चर्चेत आहे. सध्या ते बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे (Centre of Excellence) प्रमुख आहेत. युवा खेळाडूंचा विकास करणे, अंडर-19 खेळाडूंकडे लक्ष देणे आणि प्रशिक्षण व्यवस्था यांची जबाबदारी ते सांभाळत आहेत.

याआधीही भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र, त्यावेळी बीसीसीआयने गौतम गंभीर यांची निवड केली होती.

Ajit Agarkar Rohit Sharma
WWE Champion Brock Lesnar Retirement : महाकाय वादळ शांत! 'द अंडरटेकर'ला पाणी पाजणार्‍या ब्रॉक लेसनरने जाहीर केली निवृत्ती

सप्टेंबरच्या AGM मध्ये होऊ शकतो निर्णय

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) निवड समितीच्या भवितव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी मुख्य निवडकर्त्याच्या पदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या अजित आगरकर यांना पदावरून हटवण्याबाबत किंवा व्हीव्हीएस लक्ष्मण यांची नियुक्ती करण्याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news