MS Dhoni CSK Playoffs: ‘थाला’ पुन्हा खेळणार? CSK कोचने दिली धोनीबाबत मोठी अपडेट; 'या' एका कारणामुळे संघाबाहेर

MS Dhoni CSK Playoffs: एमएस धोनी अंगठ्याच्या दुखापतीमुळे गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती CSK चे बॅटिंग कोच मायकेल हसी यांनी दिली.
MS Dhoni CSK Playoffs
MS Dhoni CSK PlayoffsPudhari
Published on
Updated on

MS Dhoni CSK Playoffs: चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संघाचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार एम.एस. धोनी सध्या दुखापतीमुळे संघासोबत असला, तरी CSK जर IPL 2026 च्या प्लेऑफमध्ये पोहोचली तर धोनी पुन्हा संघात सामील होऊ शकतो, अशी माहिती संघाचे बॅटिंग कोच मायकल हसी यांनी दिली आहे.

अंगठ्याच्या दुखापतीमुळे धोनी बाहेर

चेन्नई सुपर किंग्सच्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मायकेल हसी यांनी धोनीच्या फिटनेसबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, धोनी सध्या अंगठ्याच्या दुखापतीतून सावरत आहे आणि त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नाही.

हसी म्हणाले, “धोनी सध्या संघासोबत नाही. मात्र, आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलो तर तो नक्कीच पुन्हा संघात सहभागी होईल. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे, पण ती हळूहळू बरी होत आहे.”

प्लेऑफची आशा अजून जिवंत

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर CSK साठी प्लेऑफचं समीकरण कठीण झालं आहे. आता गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना संघासाठी ‘करो या मरो’ असा आहे. हा सामना जिंकल्यास चेन्नईचे 14 गुण होतील. मात्र, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी इतर संघांच्या निकालांवरही त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे.

MS Dhoni CSK Playoffs
KKR vs MI | केकेआरचाही मुंबईला दे धक्का

SRH पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये निराशा

हसी यांनी सांगितलं की, सनरायझर्सविरुद्धच्या पराभवानंतर संघातील वातावरण निराशाजनक होतं. घरच्या मैदानावर विजयासह सामना संपवता न आल्याची खंत खेळाडूंना होती.

मात्र प्रशिक्षकांनी संघाला सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला. “आता अजून एक संधी बाकी आहे. आम्हाला लवकर सावरून पुढच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल,” असं हसी यांनी सांगितलं.

MS Dhoni CSK Playoffs
Bangladesh vs Pakistan Test Series 2026 | पाकिस्तानचा सूपडा साफ; बांगलादेशने WTC मालिका २-० ने केली आपल्या नावावर

अहमदाबादमध्ये सामना

CSK चं संपूर्ण लक्ष आता अहमदाबादमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यावर असल्याचं हसी यांनी स्पष्ट केलं. संघाने आत्मविश्वास कायम ठेवून सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. CSK चाहत्यांसाठी सध्या एकच आशा आहे संघ प्लेऑफमध्ये पोहोचावा आणि पुन्हा एकदा ‘थाला’ मैदानात दिसावा.

logo
Pudhari News
pudhari.news