Bangladesh vs Pakistan Test Series 2026 | पाकिस्तानचा सूपडा साफ; बांगलादेशने WTC मालिका २-० ने केली आपल्या नावावर

Bangladesh vs Pakistan WTC Series | दुसर्‍या कसोटी सामन्‍यात ७८ धावांनी केला पाकिस्तानचा पराभव
Bangladesh vs Pakistan WTC Series
दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा पराभव करत बांगलादेशने प्रथम घरच्‍या मैदानावर WTC मालिका २-० ने आपल्या नावावर केली. Pudhari
Published on
Updated on
Summary

बांगलादेशने पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानला कसोटी मालिकेत 'क्लीन स्वीप' केले आहे. या पराभवासोबतच पाकिस्तानचा संघ डब्ल्यूपीसी २०२७ च्या गुणतालिकेत (Points Table) आठव्या स्थानावर घसरला आहे.

Bangladesh vs Pakistan Test Series 2026

ढाका : बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २० मे रोजी संपली. ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२७ अंतर्गत खेळवली गेली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. यासह यजमान बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानचा सूपडा साफ केला आहे.

बांगलादेशने प्रथम घरच्‍या मैदानावर पाकिस्‍तनाला 'क्लीन स्वीप'

बांगलादेशने पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानला कसोटी मालिकेत 'क्लीन स्वीप' केले आहे. सिलहट येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानचा ७८ धावांनी पराभव केला. या पराभवासोबतच पाकिस्तानचा संघ डब्ल्यूपीसी २०२७ च्या गुणतालिकेत (Points Table) आठव्या स्थानावर घसरला आहे.

Bangladesh vs Pakistan WTC Series
Shaheen Afridi Ball Tampering : बॉल टेम्परिंगचा वादात अडकला शाहीन आफ्रिदी, लाजिरवाण्या कृतीने क्रिकेट जगतात खळबळ, VIDEO व्हायरल

सामन्‍यात काय घडलं?

पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक (टॉस) जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला . बांगलादेश संघाने पहिल्‍या डावात २७८ धावा केल्‍या. यामध्ये लिटन दासच्या १२६ धावांच्या दमदार खेळीचा समावेश होता. इतर कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा आकडाही पार करता आला नाही. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने ४, मोहम्मद अब्बासने ३ तर हसन अलीने २ बळी घेतले.

Bangladesh vs Pakistan WTC Series
BAN vs PAK Test : पाकिस्तानचे बांगला देशसमोर लोटांगण! ढाका कसोटीत 104 धावांनी लाजिरवाणा पराभव

पाकिस्‍तानचा पहिला डाव २३२ धावांमध्‍येच आटोपला

पहिल्‍या डावात पाकिस्तानचा संघ मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही आणि पाकिस्तानचा पहिला डाव २३२ धावांवर आटोपला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात बाबर आझमने ६८ धावांची खेळी केली, तर फिरकीपटू साजिद खानने ३८ धावा केल्या. बांगलादेशतर्फे नाहिद राणा आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले, तर तस्किन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी २-२ बळी मिळाले.

Bangladesh vs Pakistan WTC Series
Pakistan Cricket Team New Coach: सामन्यात 'जांभई' देणारा सर्फराज पाकिस्तानचा नवा कोच... U19 संघाच्या यशानंतर मिळालं प्रमोशन

बांगलादेशने पाकिस्‍तान दिले ४३७ धावांचे विशाल लक्ष्‍य

पहिल्या डावाच्या जोरावर बांगलादेशला ४६ धावांची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशने ३९० धावांचा डोंगर उभा केला, ज्यामध्ये मुशफिकुर रहीमच्या १३७ धावांच्या खेळीव्यतिरिक्त लिटन दासच्या ६९ धावा आणि सलामीवीर महमूद हसन जॉयच्या ५२ धावांच्या खेळीचा समावेश होता. पाकिस्तानसमोर ४३७ धावांचे विशाल लक्ष्य होते.

Bangladesh vs Pakistan WTC Series
Salman Agha Run Out: बांगलादेशनं हे काय केलं... ज्या पाकिस्ताननं बाजू घेतली त्यांच्याविरूद्ध 'अखिलाडूवृत्ती'ची गाठली परिसीमा?

तैजुल इस्लामने दुसऱ्या डावात घेतले ६ बळी

४३७ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवानने ९४, सलमान अली आगाने ७१ धावांचे योगदान दिले. कर्णधार शान मसूदच्या ७१ धावा तर बाबर आझम ४७ धावा केल्‍या. पाकिस्तानचा संघ ३५८ धावांवर ढेपाळला आणि हा सामना ७८ धावांनी हरला. बांगलादेशसाठी तैजुल इस्लामने दुसऱ्या डावात ६ बळी घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news