IND vs SL Smriti Mandhana : कटू ‘स्मृती’ विसरून ‘मानधना’ पुन्हा उतरणार मैदानात! श्रीलंकेला टी-20 मालिकेतून धूळ चारण्यासाठी सज्ज

21 डिसेंबरपासून India vs Sri Lanka T20 series ला धमाकेदार सुरुवात होत आहे.
IND vs SL Smriti Mandhana : कटू ‘स्मृती’ विसरून ‘मानधना’ पुन्हा उतरणार मैदानात! श्रीलंकेला टी-20 मालिकेतून धूळ चारण्यासाठी सज्ज
Published on
Updated on

नवी दिल्ली : विश्वचषक विजयानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. श्रीलंका महिला संघाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका लवकरच सुरू होत आहे. या मालिकेत उपकर्णधार स्मृती मानधना हिच्या कामगिरीकडे विशेष लक्ष लागून राहणार आहे, कारण मागील काही दिवसांपासून ती क्रिकेटपेक्षा वैयक्तिक कारणामुळे अधिक चर्चेत होती.

कधी, कुठे रंगणार पहिला सामना?

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २१ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाचे पहिले जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय महिला संघाची ही पहिली आंतरराष्ट्रीय मालिका असेल. मालिकेचा समारोप ३० डिसेंबर रोजी होणार आहे.

IND vs SL Smriti Mandhana : कटू ‘स्मृती’ विसरून ‘मानधना’ पुन्हा उतरणार मैदानात! श्रीलंकेला टी-20 मालिकेतून धूळ चारण्यासाठी सज्ज
Virat Kohli vs Rohit Sharma : विराट कोहलीमुळे रोहित शर्माचे स्थान धोक्यात, ‘रन मशीन’चे ‘हिटमॅन’ला कडवे आव्हान

मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला टी-२० सामना : २१ डिसेंबर : विशाखापट्टणम

  • दुसरा टी-२० सामना : २३ डिसेंबर : विशाखापट्टणम

  • तिसरा टी-२० सामना : २६ डिसेंबर : तिरुवनंतपुरम

  • चौथा टी-२० सामना : २८ डिसेंबर : तिरुवनंतपुरम

  • पाचवा टी-२० सामना : ३० डिसेंबर : तिरुवनंतपुरम

चर्चा आणि आत्मविश्वास

अलीकडे स्मृती मानधना तिच्या वैयक्तिक कारणामुळे (विवाह पुढे ढकलणे) चर्चेत होती. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत ती पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे.

सध्या आयसीसी टी-२० क्रमवारीत ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत स्मृतीचा बॅट तळपल्यास ती लवकरच अव्वल स्थान पटकावू शकते. त्यामुळे, तिच्या पुनरागमनाच्या या मालिकेसाठी चाहते उत्सुक आहेत.

IND vs SL Smriti Mandhana : कटू ‘स्मृती’ विसरून ‘मानधना’ पुन्हा उतरणार मैदानात! श्रीलंकेला टी-20 मालिकेतून धूळ चारण्यासाठी सज्ज
Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे मोठे नुकसान, द. आफ्रिकेची कर्णधार लॉराने मारली बाजी

स्मृती मानधनाची टी-२० मधील आकडेवारी

  • सामने : १५४

  • धावा : ३९८४

  • शतक : १

  • अर्धशतके : ३१

IND vs SL Smriti Mandhana : कटू ‘स्मृती’ विसरून ‘मानधना’ पुन्हा उतरणार मैदानात! श्रीलंकेला टी-20 मालिकेतून धूळ चारण्यासाठी सज्ज
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावात सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडू कोण? 16 डिसेंबरला लागणार बोली

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी हरमनप्रीत कौर कर्णधार असून स्मृती मानधनाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेसाठी विश्वचषक विजेत्या संघातील अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना १५ सदस्यीय चमूमध्ये स्थान देण्यात आले आहे.

संपूर्ण संघ खालीलप्रमाणे

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंह ठाकूर, ऋचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी श्री चरणी, वैष्णवी शर्मा.

IND vs SL Smriti Mandhana : कटू ‘स्मृती’ विसरून ‘मानधना’ पुन्हा उतरणार मैदानात! श्रीलंकेला टी-20 मालिकेतून धूळ चारण्यासाठी सज्ज
IPL 2026 Auction : ३५० खेळाडूंच्या लिलावाची अंतिम यादी जाहीर! अबू धाबीत लागणार दिग्गजांवर बोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news