

ipl 2026 mini auction final list announced 240 indian players shortlisted
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या मिनी ऑक्शनची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढवणारी बातमी म्हणजे, सुरुवातीला नोंदणी केलेल्या तब्बल 1355 खेळाडूंपैकी 1005 खेळाडूंना वगळण्यात आले असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केवळ 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली आहे. 16 डिसेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबू धाबी येथील एतिहाद एरिना येथे ही चुरशीची मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
शॉर्टलिस्ट केलेल्या यादीमध्ये 35 नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याच्या नावाचा समावेशही एका फ्रँचायझीच्या शिफारशीनंतर अंतिम यादीत करण्यात आला आहे. डी कॉकसह आणखी 53 खेळाडूंचा यात समावेश आहे, ज्यात 23 भारतीय आणि 12 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
अंतिम यादीतील 350 खेळाडूंमध्ये 240 भारतीय आणि 110 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 224 अनकॅप्ड भारतीय खेळाडू आणि 14 अनकॅप्ड विदेशी खेळाडू संधीच्या शोधात असतील.
कॅप्ड भारतीय : 16
कॅप्ड विदेशी : 96
अनकॅप्ड भारतीय : 224
अनकॅप्ड विदेशी : 14
एकूण : 350 खेळाडू
या लिलावात 10 संघ एकूण 77 स्लॉट भरण्यासाठी बोली लावतील, त्यापैकी 31 स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. बेस प्राइसच्या यादीत, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी कॅटेगरी म्हणजे 2 कोटी रुपये बेस प्राइस असलेली. या टॉप कॅटेगरीमध्ये 40 खेळाडूंचा समावेश आहे.
या यादीत कॅमेरून ग्रीन, लियाम लिव्हिंग्स्टन, मथीशा पथीराना आणि वानिंदू हसरंगा यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावे आहेत. मात्र, या गटातील भारतीय खेळाडूंमध्ये फक्त व्यंकटेश अय्यर आणि रवी बिश्नोई यांचाच समावेश आहे. याशिवाय, 1.5 कोटी रुपये बेस प्राइस असलेल्या 9 खेळाडूंना संधी मिळाली आहे.
2 कोटी : 40
1.5 कोटी : 9
1.25 कोटी : 4
1 कोटी : 17
75 लाख : 42
50 लाख : 4
40 लाख : 7
30 लाख : 227
खेळाडूंना रिटेन केल्यानंतर सर्व संघांकडे आता ऑक्शनसाठी किती रक्कम शिल्लक आहे, यावर सर्वांचे लक्ष असेल.
कोलकाता नाईट रायडर्स : 64.3 कोटी
चेन्नई सुपर किंग्स : 43.4 कोटी
सनरायझर्स हैदराबाद : 25.5 कोटी
लखनऊ सुपर जायंट्स : 22.95 कोटी
दिल्ली कॅपिटल्स : 21.8 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु : 16.4 कोटी
राजस्थान रॉयल्स : 16.05 कोटी
गुजरात टायटन्स : 12.9 कोटी
पंजाब किंग्स : 11.5 कोटी
मुंबई इंडियन्स : 2.75 कोटी
मिनी ऑक्शनची सुरुवात पुढच्या आठवड्यात मंगळवारी (16 डिसेंबर) भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता होईल.