

कराची : भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट बोर्डात आशिया कप 2023 च्या आयोजनावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणात भारत आणि पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू वक्तव्ये करत आहेत. आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने देखील याबाबत वक्तव्य केले आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू म्हणाला, 'आयसीसीने आता या प्रकरणात लक्ष घ्यालावे. हे प्रकरण आता संपवले पाहिजे. (BCCI)
बीसीसीआय याप्रकरणी काही करायच्या आत हे करायला हवे, भारत जर डोळे वटारत असेल, एवढी कडक भूमिका घेत असेल तर त्यांनी ही भूमिका घेण्यासाठी स्वतःला तेवढे मजबूत केले आहे. त्यामुळेच ते अशा प्रकारची भूमिका घेऊ शकतात. नाही तर त्यांची हिंमत झाली नसती.' आफ्रिदी समा टी.व्ही.शी बोलताना म्हणाला की, 'भारत आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार की नाही, हे मला माहिती नाही. किंवा आपण भारतात होणार्या वर्ल्डकपवर बहिष्कार टाकणार की नाही, हे देखील आम्हाला माहिती नाही. मी फक्त एवढचे सांगू शकतो की आयसीसी देखील बीसीसीआयसमोर काहीच करू शकत नाही.' (BCCI)
हेही वाचा;