Prafull Billore : चहावाल्याने घेतली ९० लाखांची मर्सिडीज कार ! कोण आहे कोट्यधीश प्रफुल्ल बिलोरे? | पुढारी

Prafull Billore : चहावाल्याने घेतली ९० लाखांची मर्सिडीज कार ! कोण आहे कोट्यधीश प्रफुल्ल बिलोरे?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : एमबीए महाविद्यालयात ॲडमिशन मिळविण्यासाठी घेण्यात येणारी कॉमन ॲडमिशन टेस्ट (CAT) पास न करु शकणारा प्रफुल्ल बिलोरे उर्फ एमबीए चाय वाला आज कोट्यधीश आहे. देशाभरात त्याला चाय वाला या नावाने ओळखले जाते. चहा विकून तो अवघ्या २६ व्या वर्षी तो कोट्यधीश बनला. यशाच्या शिखरावर असताना आता त्याने तब्बल ९० लाखांची मर्सिडिस बेन्झ कंपनीची GLE300D ही लग्झरी एसयुव्ही कार खरेदी केली आहे. (Prafull Billore)

प्रफुल्लने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कारचा फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ‘आयुष्य हळू हळू बदलते’. या फोटोमध्ये तो त्याची पत्नी आणि मुलासोबत दिसत आहे. या कारचे आणखी फोटो शेअर करत त्याने लिहले आहे की, देवाचे आशिर्वाद, कुटुंबाची साथ, सर्वांचे कष्ट आणि जगभरातील लोकांचे प्रेम आणि आशिर्वादाने आज Mercedes GLE 300D नव्या पाहुण्याच्या रुपात घरी आली आहे…अशा आठवणी बनविण्यास तयार आहे ज्या आयुष्यभर सोबत राहतील. प्रफुल्ल बिलोरे याने आपल्या इन्स्टाग्रामवर वाहनाची डिलीवरी घेतानाचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. (Prafull Billore)

prafull billore

कोण आहे प्रफुल्ल बिलोरे

प्रफुल्ल बिल्लौरे हा एमबीएस चायवाला या ब्रँड चहाचे संस्थापक आहेत. तो गुजरातचा असून त्याचा जन्म १९९६ मध्ये झाला होता. त्याची एकूण संपत्ती सुमारे २४ कोटींच्या आसपास आहे. रिपोर्ट्सनुसार, MBA चायवालाचे देशभरात एकूण १०० आउटलेट आहेत. त्याच्या एकूण संपत्तीबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. २०१७ मध्ये त्यांने हा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर बिल्लौर आता मोटिव्हेशनल स्पीच (motivational speech) सुद्धा दतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prafull Billore (@prafullmbachaiwala)


अधिक वाचा :

Back to top button