

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात शिखर धवन च्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. शिखर धवन असा काय विक्रम केला आहे हे सविस्तर वाचण्यासाठी पुढे वाचत रहा..
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दरम्यान, टीम इंडियाचा मुख्य संघ इंग्लंड दौर्यावर आहे. नियमित कर्णधार विराट कोहली आणि मुख्य संघासह इंग्लंडमध्ये आहे. त्यातच भारतीय संघाची नवी वनडे टीन श्रीलंका दौ-यावर गेली आहे. या नव्या संघाचे नेतृत्व 'गब्बर' म्हणून ऑळखला जाणारा शिखर धवन करत आहे. याचबरोबर त्याने आपल्या नावावर एक अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
इंडिया ए च्या कर्णधार पदाची धुरा सांभाळलेल्या शिखर धवनकडे पहिल्यांदाच वरीष्ठ संघाचे नेतृत्व बहाल करण्यात आले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. शिखर धवनला वयाच्या ३५ व्या वर्षी आणि २२५ दिवसांनी भारतीय वनडे संघाचा कर्णधार होण्याची संधी मिळाली आहे.
शिखर धवन हा भारताकडून कर्णधार पद भूषवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यासह तो एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणारा भारताचा २५ वा खेळाडू आहे. तब्बल १४२ आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळल्यानंतर तो भारताचे नेतृत्व करतोय. याच बरोबर त्याच्या नावे एक निराळा विक्रम जमा झाला.
एका नव्या जवाबदारीसह मैदानात उतरलेल्या शिखरला या सामन्यात २३ धावा बनवतात वनडे क्रिकेटमध्ये ६ हजार धावा बनवण्याची संधी आहे. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय फलंदाज ठरेल. याशिवाय तो सर्वात जलद ६००० वनडे धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो.
त्यापूर्वी हेमू अधिकारी यांनी १९५९ मध्ये मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कर्णधार पद भूषवले होते. त्यावेळी त्यांचे वय ३९ वर्षे १९० दिवस होते.
हेमू अधिकारी : 39 वर्षे 190 दिवस विरुद्ध वेस्टइंडीज (दिल्ली, 1959)
वीनू मांकड : 39 वर्षे 264 दिवस विरुद्ध पाकिस्तान (ढाका, 1955)
सीके नायडू : 36 वर्षे 238 दिवस विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स, 1932)
विजय हजारे : 36 वर्षे 236 दिवस vs इंग्लंड (दिल्ली, 1951)
नवाब ऑफ पटौदी सीनियर : 36 वर्षे 98 दिवस विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स, 1946)
लाला अमरनाथ : 36 वर्षे 78 दिवस विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ब्रिस्बेन, 1947)
दासुन शनाका मागील चार वर्षातील श्रीलंका संघाचा १० कर्णधार आहे. धनंजय डिसिल्वा आणि वेगवान गोलंदाज दुशमंत चमीरा या दोघांना सोडल्यास इतर कुठलाही खेळाडू नजर येत नाही जो शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आव्हान देऊ शकेल.